- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akot-court-crime-murder-case: पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी फुलसिंग जमरा याला जन्मठेप; परिस्थितीजन्य पुरावे ठरले निर्णायक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
अकोट अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; पत्नीची कु-हाडीने हत्या केल्याप्रकरणी १० हजारांचा दंडही ठोठावला
अकोट | प्रतिनिधी
पत्नीचा अत्यंत क्रूरपणे खून केल्याप्रकरणी आरोपी फुलसिंग गुलाबसिंग जमरा (वय अंदाजे ४०, रा. उमरशेवडी, ता. तेल्हारा, जि. अकोला) याला अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी सुनावली. त्यामुळे आरोपीला जिवंत असेपर्यंत कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
ठळक मुद्दे
*आरोपी फुलसिंग जमरा याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
*प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुरावे ठरले महत्त्वाचे
*आरोपीच्या ८ वर्षीय मुलीची साक्षही ठरली निर्णायक
*पत्नीला कु-हाडीने मारहाण करून हत्या केल्याचा आरोप सिद्ध
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक कस्तुराबाई जमरा आणि आरोपी फुलसिंग जमरा हे पती-पत्नी होते. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन होते आणि तो किरकोळ कारणांवरून पत्नीशी वारंवार वाद घालून मारहाण करत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली.
दि. ६ मे २०२४ रोजी सायंकाळी ते मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने आपल्या राहत्या घरी कस्तुराबाई यांच्या कपाळावर, हनुवटीवर आणि शरीरावर कु-हाडीने वार करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंदा पांडव यांनी केला आणि आरोपीविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी आणि आरोपीच्या ८ वर्षीय अल्पवयीन मुलीची साक्ष विशेष महत्त्वाची ठरली.
अंतिम युक्तीवाद करताना सरकारी पक्षाने आरोपीचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे सांगत कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी परिस्थितीजन्य पुराव्यांची मजबूत साखळी आरोपीविरुद्ध असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
न्यायालयाने सर्व पुरावे, साक्षी आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेत आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Akola News
Akot Court
Breaking News
Court Verdict
Crime News
Justice
Life Imprisonment
Maharashtra News
Murder Case
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा