भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला असून, या कठीण परिस्थितीत राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल. मात्र, या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना कोणी त्रास दिल्यास ते कदापि सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला येथे दिला.
४२७ शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली
अकोला येथील विस्तारित सर्किट हाऊस येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तब्बल ४२७ शेतकऱ्यांची निवेदने त्यांनी स्वीकारली.
सावकारी, पाणीटंचाई, कर्जबाजारीपणा तसेच शेतीशी संबंधित विविध समस्यांबाबत शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. प्रत्येक शेतकऱ्याची अडचण समजून घेत शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
‘शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना तातडीने मदत देण्यात येईल. हे सरकार शेतकऱ्यांचेच आहे,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्र्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
निवेदने स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी येवता येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अकोला तालुक्यातील शेतीविषयक परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकरी शेख रशीद शेख इस्माईल यांच्या शेताची पाहणी केली. शेख रजू शेख रशीद यांनी शेतात विहीर उपलब्ध असतानाही पाण्याची कमतरता भासत असल्याचे सांगितले. भूजल पातळी खालावल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्याची परिस्थिती याबाबत त्यांनी मंत्र्यांना माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या व्यथा थेट प्रशासनापर्यंत
यावेळी प्रदीप हागे, सरपंच वंदनाताई शिरसाट, गोपाल चांदुरकर, संजय वाडेकर, बळीराम ढोरे, काशीराम भोयर, प्रकाश हागे, मुकुंदराव हागे, दीपक भोयर, दीपक गोपनारायण, किशोर जायले, दिलीप गोपनारायण, उमेश मुरूमकर, माधव हागे, गजानन धोत्रे आदींनी आपल्या समस्या व मागण्या मांडल्या.
दुष्काळी परिस्थितीत पाणी, कर्ज, सावकारी आणि शेतीशी संबंधित प्रश्न गंभीर बनले असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
यावेळी मान्यवरांची उपस्थिती
यावेळी पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महापौर शारदा खेडकर, आमदार वसंत खंडेलवाल, संतोष शिवरकर, जयंत मसने, चंद्रकांत अंधारे, महादेव मानकर, अमित कावरे, राजेश बेले, अनिल गावंडे, वैभव माहोरे, संजय कोरडे, प्रवीण हगवणे, महेंद्र काळे, अंबादास उमाळे, वैशाली निकम, नारायण बोर्डे, अंकुश इंगळे, गिरीश जोशी, डॉ. शंकरराव वाकोडे, किशोर कुचके, नितीन लांडे, डॉ. अमित कावरे, माधव मानकर आदी उपस्थित होते.
ठळक मुद्दे
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्यासोबत झुणका भाकरीचा घास घेतला-कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात
- महसूल मंत्र्यांनी ४२७ शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारली
- पाणीटंचाई व खालावलेल्या भूजल पातळीचा प्रश्न ऐरणीवर
- सावकारी आणि कर्जाच्या समस्यांवर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
- महसूल मंत्र्यांची येवता येथे शेताच्या बांधावर पाहणी
- शासन बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा विश्वास
- शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा
- शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून तातडीने मदतीचे आश्वासन
अकोला, दुष्काळ, शेतकरी, बळीराजा, चंद्रशेखरबावनकुळे, महसूलमंत्री, शेतकरीप्रश्न, पाणीटंचाई, कर्जबाजारीपणा सावकारी, Akola, Farmers, Drought, BAnews24, bhartiya alankar news 24, भारतीय अलंकार न्यूज 24
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा