akola-news-rain-alert-monsoon :अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, पातूर आणि अकोला तालुक्यात अतिवृष्टी; नदी नाल्यांना पूर, मार्ग बंद!



ठळक मुद्दा

"अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर आ. रणधीर सावरकर यांच्याकडून प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश"



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, पातूर आणि अकोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदींना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाशी तातडीने संवाद साधला आहे.


पूरग्रस्त नागरिकांना आणि ग्रामस्थांना तातडीने मदतीचा हात देण्यात यावा. तसेच प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.


या संदर्भात वीज वितरण कंपनी, महसूल विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, पोलीस विभाग आणि आपातकालीन व्यवस्थापन* या सर्व यंत्रणांशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.


खासदार अनुप धोत्रे, जिल्ह्याचे पालकमंत्री एड. आकाश फुंडकर, सहकारी आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


आमदार रणधीर सावरकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,  

"सर्वांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणतीही अडचण असल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा."



पूरस्थिती अलर्ट  

अतिवृष्टीमुळे बाळापूर, ते तेल्हारा,, पातूर, अकोला तालुक्यात नद्यांना पूर. 


आ. रणधीर सावरकर यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.  

वीज, महसूल, कृषी, बांधकाम, पोलीस व आपातकालीन यंत्रणा अलर्टवर.


खा. अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश फुंडकर, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे यांच्याशी समन्वय.  


नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.



तेल्हारा निंबा अकोला मार्ग बंद

       

तेल्हारा -निंबा- अकोला मार्ग बंद आहे.. मनात्रीच्या पुलावरुन ५-६ फुट वर पाणी वाहत आहे. पंचगव्हाण मार्ग देखील बंद असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर वाडेगाव येथील निर्गुणा नदीला महापूर आल्याचे समजते. अकोला शहरातून वाहणारी मोर्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने राजेश्वर सेतू मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.


सद्यस्थितीत नदीनाले वाहत असुन आपला परिवार घेऊन घराबाहेर पडु नये. अत्यावश्यक असेल तर शक्यतोवर चौकशी करुनच घराबाहेर पडावे, अशा सूचना प्रशासन तर्फे देण्यात आल्या आहेत.



पाणी पातळी


दिनांक 31/07/2026

वेळ : 7:00 AM वाजता 

मोर्णा नदी

उंची ..1.70m

नदी पातळी  270.30 M

विसर्ग....300.78 Cumecs

अकोला पाटबंधारे विभाग अकोला


दि 31/07/2026 Time -7:00 AM वा.


काटेपूर्णा प्रकल्प 

  

पातळी 341.01 मी 

साठा 18.010 mm3 

टक्केवारी  20.85%

आजचा पाऊस  52 mm

एकूण पाऊस    200  mm

गेट  00 open  by 00 सेमी.

डिस्चार्ज 00.00 cumecs 


वान प्रकल्प ता,तेल्हारा

पातळी 402.00  मी

साठा  43.45 mm3

टक्केवारी 53.02  %

आजचा पाऊस    109mm

एकूण पाऊस    511 mm

 गेट 00 open by   00  सेमी

Discharge 00.00  cumecs.  


मोर्णा प्रकल्प ता पातूर

पातळी  363.80 मी

साठा      23.56 mm3

टक्केवारी  56.82 %

आजचा पाऊस  137 mm

एकूण पाऊस 473 mm

सांडवा. 00 सेमी,

विसर्ग  0.00 cumecs.


निर्गुणा प्रकल्प ता पातूर

पातळी     386.00 मी

साठा        10.76 mm3

टक्केवारी  37.30  %

आजचा पाऊस   00  mm

एकूण पाऊस     00   mm

सांडवा   00 सेमी 

 विसर्ग 00 cumecs


उमा प्रकल्प ता, मूर्तीजापुर 

पातळी       337.55 मी

साठा  0.293 mm3

टक्केवारी. 2.51%

आजचा पाऊस  20mm

एकूण पाऊस  90mm

सांडवा  0.00 सेमी

विसर्ग   0.00  घमी.से


दगडपारवा प्रकल्प 

जलाशय पातळी -315.55 मीटर 

उपयुक्त साठा 04.61 द.ल.घ.मी. 

टक्केवारी - 45.33% 

आजचा पाऊस - 20 मीमी  

एकूण पाऊस - 237 मीमी

सर्व गेट बंद आहेत

टिप्पण्या