- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
railway-land-encroachment-akl: अकोल्यातील तार फाईल परिसरातील ४० वर्षांपासूनचे अतिक्रमण हटले; कोणत्याही बळाचा वापर न करता कारवाई पूर्ण- रेल्वे प्रशासन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
रेल्वेची २२,७५० चौरस मीटर जमीन मोकळी; सुमारे २५ कोटी रुपयांच्या मालमत्तेची पुनर्प्राप्ती
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला, दि. १ जून : अकोला रेल्वे स्थानकाजवळील तार फाईल परिसरात रेल्वे प्रशासनाने मोठी अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबवत तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ रेल्वेच्या जमिनीवर असलेली १६४ तात्पुरती व कायमस्वरूपी अतिक्रमणे हटविली. या कारवाईमुळे सुमारे २२,७५० चौरस मीटर मौल्यवान रेल्वे जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून तिची अंदाजित किंमत सुमारे २५ कोटी रुपये आहे.
भुसावळ रेल्वे मंडळाच्या अभियांत्रिकी विभाग, विधी विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांच्या गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही कारवाई शक्य झाली. यामध्ये अतिक्रमण धारकांना नोटिसा देणे, राज्य प्रशासनासोबत संयुक्त बैठका घेणे, जमिनीचे मोजमाप करणे, कायदेशीर व प्रशासकीय अडचणी दूर करणे तसेच स्थानिक घटकांशी समन्वय साधणे अशा विविध उपाययोजनांचा समावेश होता.
रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेदरम्यान ही कारवाई पार पडली. अतिक्रमण हटविताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा बल, शासकीय रेल्वे पोलीस (GRP), अकोला शहर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
विशेष म्हणजे, रेल्वे अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांशी सातत्याने संवाद साधल्याने सर्वांनी स्वेच्छेने जागा रिकामी केली. त्यामुळे कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारच्या बळाचा वापर करण्याची आवश्यकता भासली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
मोहीमेत वापरण्यात आलेली यंत्रणा
• ७ जेसीबी मशीन
• १६० अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी
• ५० रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी
• २५ शासकीय रेल्वे पोलीस कर्मचारी
• ३०० शहर पोलीस कर्मचारी
रेल्वे प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमणधारकांच्या मागणीनुसार राज्य भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीचे अधिकृत मोजमापही करण्यात आले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली.
या यशस्वी मोहिमेमुळे भविष्यातील रेल्वे विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा उभारणी आणि प्रवाशांसाठीच्या विविध सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे. यामुळे रेल्वेची कार्यक्षमता वाढण्यासोबतच जनसेवाही अधिक प्रभावी होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
ठळक मुद्दे
*१६४ अतिक्रमित संरचना हटविण्यात आल्या
*२२,७५० चौरस मीटर रेल्वे जमीन अतिक्रमणमुक्त
*मुक्त झालेल्या जमिनीची किंमत सुमारे ₹२५ कोटी
*४० वर्षांहून अधिक काळापासूनचे अतिक्रमण हटविले
*कोणत्याही बळाचा वापर न करता कारवाई पूर्ण
*भविष्यातील रेल्वे विकास प्रकल्पांना मिळणार चालना
Akola
Akola News
Bhusawal Division
Encroachment Removal
GRP
Indian Railways
Maharashtra News Breaking News
Railway Development
Railway Land
RPF
Tar File Area
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा