- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
rahul-sarasar-murder-case-akl: अलंकार मार्केटमधील खून उघडकीस; प्रेमविवाहाच्या रागातून राहुलची निर्घृण हत्या, ४ आरोपी ताब्यात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
स्थानिक गुन्हे शाखेची भुसावळपर्यंत धडक कारवाई
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार मार्केट परिसरात घडलेल्या तरुणाच्या खूनप्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. प्रेमविवाहाच्या वादातून कट रचून तरुणाची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत राहुल कालू सारसर याने आरोपींच्या नातेवाईक युवती (भाची) सोबत प्रेमविवाह केल्याचा राग आरोपींना होता. याच कारणातून आरोपींनी कटकारस्थान रचून १५ मे २०२६ रोजी अलंकार मार्केट मधील राज मंदिर बार च्या गल्लीत राहुलवर पाइप व धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या राहुलचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात अप. क्र. ३७८/२०२६ अन्वये विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १६ मे रोजी बादशहा सरू पारोचे (वय ३५, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे उर्वरित आरोपी भुसावळ येथे असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव-भुसावळ महामार्गावर सापळा रचून संतोष रामचरण पारोचे (२४, रा. विजय नगर तर्फैल, अकोला), गौरव राहुल करोसीया (१८) आणि हारीश उर्फ हर्ष राहुल करोसीया (२०, दोघे रा. आंबेडकर नगर, वरणगाव, जि. जळगाव) यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
.
कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण यांच्यासह शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, किशोर सोनोने, एजाज अहमद, रवि खंडारे, भास्कर धोत्रे, पोलीस अमलदार श्रीकांत पातोंड, अमोल दिपके, मनीष ठाकरे यांनी केली आहे.
ठळक मुद्दे
प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाची हत्या
अलंकार मार्केट परिसरातील थरारक घटना
स्थानिक गुन्हे शाखेची जलद कारवाई
भुसावळमधून ३ आरोपी ताब्यात
एकूण ४ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीमुळे तपासाला यश
Akola
Akola Police
alankar market
Crime News
Local Crime Branch
Love Marriage
Maharashtra News
Murder Case
Police Action
Ramdas Peth
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा