- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
प्रा. मोटेगावकर यांच्या क्लासेससमोर घोषणाबाजी; फोटोला काळे फासून बॅनर्स फाडले
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटले असून या प्रकरणात अटक झालेल्या प्राध्यापक मोटेगावकर यांच्या विरोधात अकोल्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मोटेगावकर यांच्या क्लासेससमोर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान संतप्त मनसेसैनिकांनी मोटेगावकर यांच्या फोटोला काळे फासले तसेच परिसरातील बॅनर्स फाडून तीव्र संताप व्यक्त केला. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी “मोटेगावकर यांना फाशीची शिक्षा द्यावी” अशी मागणी करत विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे तात्काळ परत करण्याची मागणी केली. तसेच अकोल्यात मोटेगावकर यांचे एकही क्लास सुरू राहू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून इतर संबंधितांवरही कारवाई सुरू आहे.
दरम्यान, अकोल्यातील या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ठळक मुद्दे :
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभर संताप
प्रा. मोटेगावकर अटकेनंतर अकोल्यात मनसेचे आंदोलन
क्लासेससमोर घोषणाबाजी व बॅनर्स फाडले
विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याची मागणी
“क्लास सुरू राहू देणार नाही” असा मनसेचा इशारा
अकोला
मनसे
Akola
Akola News
Maharashtra News
MNS
Motegaonkar
NEET Paper Leak
NEET Scam
Student Justice
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा