boragaon-manju-murder-case: हत्येमागे अनैतिक संबंधांची किनार; बोरगाव मंजू खून प्रकरणाचा उलगडा, यवतमाळ येथील आरोपी ताब्यात



ठळक मुद्दा

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : बोरगाव मंजू परिसरात सापडलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपीला ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि यवतमाळ येथून आरोपीला अटक करण्यात आली.

दिनांक २२ मे २०२६ रोजी बोरगाव मंजू हद्दीतील परिसरात रेल्वे अंडरपासमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावरील परिस्थिती संशयास्पद असल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

स्थानीक गुन्हे शाखा अकोला पथकानी सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना यातील मृतक याची ओळख पटविणे करीता अकोला जिल्हयातील व आजुबाजुच्या जिल्हयातील मिसींग व्यक्तींबाबत माहीती घेत असतांना, गोपनीय बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, यवतमाळ येथील विक्की उर्फ बबलु भेंडे हा २१ मे २०२६ चे रात्री पासुन बेपत्ता असल्याची माहीती मिळाली. अशा मिळालेल्या माहीतीवरून पोलीस स्टेशन अवधुतवाडी, यवतमाळ येथे संपर्क साधुन अनोळखी मृतक बाबत माहीत घेवुन सदरील अनोळखी मृतक हा विक्की उर्फ बबलु राजु भेंडे (वय-१९ वर्ष राहणार गुरूनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ) असल्याचे निष्पन्न झाले.


मृतक विक्की याचे सोबत कोणाचे वाद अथवा भांडणे झाली का, याबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता, मृतक याच्या शेजारी राहणारा युवराज शंकर तांगडे (वय ४१ वर्षे रा. गुरूनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ) याचे सोबत भांडण झाल्याचे समजल्याने त्यास यवतमाळ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेवुन स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथे आणले.


आरोपी युवराज शंकर तांगडे ,(वय ४१ वर्षे रा. गुरूनानक नगर, गोधणी रोड, यवतमाळ) याने यातील मृतक यास त्याच्या पत्नी सोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयाच्या कारणावरून दगडाने ठेचुन हत्या केल्याची कबुली दिल्याने आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन बोरगाव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले आहे.


या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदार आणि जलद तपासाच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचत गुन्ह्याचा उलगडा केला. 


ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे, जीपीएसआय दशरथ बोरकर यांच्या सह शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, एजाज अहमद, स्वप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड, अन्सार अहेमद, राजसिंह चंदेल, राहुल गायकवाड, आकाश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, अशोक सोनवणे, अमोल दिपके, विनोद ठाकरे, रामकिशन डोईफोडे, देवानंद खरात, मनिष ठाकरे यांनी केली.


ठळक मुद्दे

  • बोरगाव मंजू येथे अनोळखी मृतदेह आढळला

  • अवघ्या १२ तासांत खूनप्रकरणाचा उलगडा

  • मृतकाची ओळख विक्की उर्फ बब्बू भेंडे अशी पटली

  • यवतमाळ येथून आरोपी युवराज तांगडे ताब्यात

  • अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या केल्याची कबुली

  • स्थानिक गुन्हे शाखेची जलद व धडक कारवाई



टिप्पण्या