- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-news-railway-tarfilearea: रेल्वेच्या कारवाईपूर्वी पुनर्वसन करा; नागरिकांना बेघर करू नका – आ. साजिद खान पठाण
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
तारफैल परिसरातील कुटुंबीयांचा प्रश्न ऐरणीवर; भूमी अभिलेख कार्यालयात बैठक घेऊन मोजणीतील तांत्रिक बाबींचा घेतला आढावा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. रेल्वे विभागाकडून संबंधित जागा ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात बैठक घेत प्रशासनाकडे प्रभावित कुटुंबियांच्या पुनर्वसनाची जोरदार मागणी केली.
तारफैल परिसरातील काही भाग रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत असून, त्या ठिकाणी अनेक कुटुंबे दशकांपासून राहत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागामार्फत जागेची मोजणीही करण्यात आली आहे.
बैठकीदरम्यान आ. पठाण यांनी मोजणी शिट, सीमांकन व अन्य तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. “जागा ताब्यात घेण्यापूर्वी शासनाने प्रभावित कुटुंबियांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अचानक बेघर करू नये,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. जर तातडीने तोडगा निघत नसेल, तर कुटुंबियांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी काही कालावधी देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
यापूर्वीही या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली होती. तसेच पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याशी चर्चा करून पुनर्वसनाचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी “कोणावरही अन्याय होणार नाही,” अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती आ. पठाण यांनी दिली.
दरम्यान, जुने शहरातील गडंकी परिसरातील काही जागाही रेल्वे प्रशासन ताब्यात घेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी आ. पठाण यांना दिली. या प्रकरणातही भूमी अभिलेख विभागाने तातडीने मोजमाप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीला माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, नगरसेविका सुवर्णरेखा जाधव, मोईन खान यांच्यासह परिसरातील नागरिक व प्रभावित कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Citizens
Homeless
Land Records Office
land survey
Railway
Rehabilitation
Sajid Khan Pathan
Tarfile area
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा