akola-crime-court-legal-news: समान नावामुळे चुकीच्या अटकेची शक्यता ; न्यायालयाकडून आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर, ॲड. एम.बी. शर्मा यांचा जोरकस युक्तीवाद



ठळक मुद्दा

CCTV फुटेजमध्ये सहभागाचा पुरावा न आढळल्याने दिलासा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात नाव आल्याने अटक होण्याची शक्यता असलेल्या गुलाम अली नदार अली यांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज व तपासातील कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर आरोपीचा घटनेतील प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नसल्याचे नमूद केले. 


नेमके प्रकरण काय?


फिर्यादी विनीत विरेंद्रसिंह ठाकूर यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, घराजवळ काही युवक सिगारेट ओढत असल्याने त्यांना विरोध केला असता वाद झाला. त्यानंतर काही वेळात ५ ते ६ जणांनी घराजवळ येऊन मारहाण केली. यावेळी एका व्यक्तीने गळ्यावर तर दुसऱ्याने छातीवर चाकूने वार केल्याचा आरोप करण्यात आला होता. 


ॲड. एम.बी. शर्मा यांचा जोरकस युक्तीवाद 


अर्जदार गुलाम अली नादीर अली यांची  बाजू मांडताना ॲड. एम. बी. शर्मा  ( ॲड. मधुसूदन शर्मा) यांनी न्यायालयात अर्जदार (आरोपी) हा निर्दोष असून केवळ समान नाव असल्याने गुन्ह्यात गोवले जात असल्याचा दावा केला. समाजात अर्जदाराची प्रतिमा चांगली असून अटक झाल्यास प्रतिष्ठेला धक्का बसेल, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. 


न्यायालयाचे निरीक्षण


न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश दिले होते. सादर करण्यात आलेल्या फुटेज व छायाचित्रांमध्ये आरोपीचा सहभाग अथवा उपस्थिती स्पष्ट दिसून आली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच “गुलाम अली” नावाचे अनेक व्यक्ती असल्याने चुकीच्या व्यक्तीला अटक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवले. 


२५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन


न्यायालयाने आरोपीस २५ हजार रुपयांच्या पी.बी. व एस.बी.वर अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच साक्षीदारांवर दबाव टाकू नये, पुराव्यात छेडछाड करू नये व तपासात सहकार्य करावे, अशा अटी घालण्यात आल्या. 


ठळक मुद्दे :


सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल


समान नावामुळे चुकीच्या अटकेची शक्यता


CCTV फुटेजमध्ये आरोपीचा सहभाग स्पष्ट नाही


जिल्हा न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर


२५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका




टिप्पण्या