राष्ट्रीय भजनकारांची राहणार उपस्थिती
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सामाजिक,सांस्कृतिक व आध्यात्मिक सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या युवकांच्या गोरक्षण रोडचा राजा- विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महानगरात द्वितीय श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय भजनकार सहभागी होऊन महानगरात भक्तीभाव निर्माण करणार असल्याची माहिती रविवारी रामदेवबाबा- श्यामबाबा मंदिरात मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता मुर्तीजापुर रोडवरील सिटी स्पोर्ट क्लबच्या भव्य प्रांगणात हा द्वितीय श्री श्याम संकीर्तन महोत्सव होणार आहे. मंडळाच्या वतीने गतवर्षी अशाच प्रकारचा प्रथम श्याम संकीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये राष्ट्रीय भजनकार राज पारीक उपस्थित होऊन त्यांनी संगीतमय भजने सादर केली होती. यावर्षी या राष्ट्रीय संकीर्तन महोत्सवात खाटू नरेश श्याम भक्तात प्रसिद्ध असणारे "तीन बाण के धारी" या अदभूत भजनाने राष्ट्रीय कीर्ती प्राप्त करणारे राजस्थान येथील प्रसिद्ध भजनकार छोटूसिंग रावणा हे प्रथमच विदर्भात येत असून अकोला शहरात श्याम भजनांची वर्षा भक्तांवर करणार आहेत. त्यांच्या समवेत राजस्थान येथील श्यामबाबाचे पावन खाटू धाम येथील सेवक परिवार आलूसिंह व मोहनदास यांचे वंशज सेवाधारी भजनकार महाराज शामसिंह चौहान यांची उपस्थिती व इंदोर येथील बासरी वादक देव कनेरीया यांची साथसंगत लाभणार आहे. या सोहळ्यात स्थानीय भजनकार गोपाल शर्मा हारे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी निर्माण केलेल्या "गोरक्षण का राजा"-या गीताच्या चित्रफितीचा अनावरण सोहळा होणार आहे.
या भजन संकीर्तन महोत्सवात आकर्षक व भक्तिमय श्री श्यामबाबांचा भव्य दरबार निर्माण करण्यात येणार असून यामध्ये फुलांची व सुवासिक अत्तरांची वर्षा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या प्रारंभ प्रसंगी भव्य आतिषबाजी करून मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. उत्सवाच्या समाप्तीनंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पावन श्री श्याम संकीर्तन महोत्सवाचा समस्त महिला पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले..
या पत्रकार परिषदेत मंडळाचे मार्गदर्शक सुधीर रांदड, संजय शर्मा, मुरलीधर उपाध्याय, ॲड. सौरभ शर्मा, राजू शर्मा बालाजी, प्रथमेश शर्मा, मधुर बिसेन, डॉ. सिमरनजीत सिह बछेर,पंडित श्रीकांत इंदोरीया, मुकेश शर्मा, अनमोल बछेर, सुनील कोरडीया, अभिलाष गाढे, हिमांशू दोशी, यश बियाणी, समर्थ सोनोने, कृष्णा शर्मा, सम्यक शर्मा, समवेत गोरक्षण रोड का राजा -विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ गोरक्षण रोडचे समस्त पदाधिकारी व सेवाधारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा