- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
hidayat-patel-murder-case- update: अकोल्यात काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई; मुख्य संशयित नागपूरमधून ताब्यात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
तीन महिन्यांपासून फरार असलेला राजू बोचे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; उर्वरित आरोपींच्या अटकेकडे समर्थकांचे लक्ष
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला जिल्ह्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रमुख संशयित आरोपी राजू विठ्ठलराव बोचे याला नागपूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात फतेह अली खान रफत उल्ला खान पटेल यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्ह्यात संशयित म्हणून राजू बोचे याचे नाव नमूद करण्यात आले होते.
आरोपीला ताब्यात घेण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक नागपूरला रवाना झाले असून, लवकरच त्याला अकोट येथे आणून पुढील चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, या हत्येप्रकरणात आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून फरार होते. त्यापैकी एकाला आता अटक करण्यात आली असली तरी उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे त्यांना केव्हा अटक होणार याकडे हिदायत पटेल यांच्या समर्थकांचे लक्ष लागून आहे.
हल्ल्याची पार्श्वभूमी
दि. ६ जानेवारी रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा गावात काँग्रेस नेते हिदायत उल्ला खा बरकत उल्ला खा पटेल यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर उबेद पटेल उर्फ कालू पटेल (२५) याला त्याच दिवशी अकोट ग्रामीण पोलिसांनी पणज येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुढील तपासात राजू बोचे याचे नाव समोर आले होते.
ठळक मुद्दे
नागपूरमधून मुख्य संशयित राजू बोचे ताब्यात
अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक आरोपीला आणण्यासाठी रवाना
तीन महिन्यांपासून आरोपी फरार होते
एक आरोपी आधीच अटकेत, इतर अजूनही फरार
हिदायत पटेल समर्थकांचे पोलिसांकडे लक्ष
पुढे काय?
या प्रकरणातील उर्वरित संशयित आरोपी मो. बदृजमा , संजय बोडखे या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. आरोपींच्या अटकेनंतरच या हत्येचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे सर्व आरोपी सक्रिय राजकारणी असल्यामुळे अवघ्या राज्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.
akola crime
akot police
breaking news
Congress Leader Murder
crime news
Hidayat patel
maharashtra news
Nagpur Arrest
Police Action
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा