ठळक मुद्दा
९०१ घरगट, ११६१ कर्मचारी सज्ज; नागरिकांनी खरी माहिती देण्याचे प्रशासनाचे आवाहन
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक व जनगणना विभागाच्या वतीने ३० एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. सुनील लहाने यांनी शहरातील जनगणना कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
अकोला महानगरपालिका येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत जनगणना विभाग प्रमुख अनिल बिडवे, मनपा उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी दिलीप जाधव, चार्ज अधिकारी विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप, गजानन घोंगे, मनपा सचिव अमोल डोईफोडे, तांत्रिक अधिकारी चंदन प्रसाद, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा आदींची उपस्थिती होती.
महानगरपालिका क्षेत्रात जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून १ मे २०२६ पासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
ठळक मुद्दे
अकोला मनपा क्षेत्रात एकूण ९०१ घरगटांची निर्मिती
पूर्व विभाग – २८०
पश्चिम विभाग – २४५
उत्तर विभाग – १३६
दक्षिण विभाग – २४०
९९३ प्रगणक व १६८ पर्यवेक्षक असे एकूण ११६१ कर्मचारी नियुक्त
प्रशिक्षण शिबिरे :
जनगणना टप्पे :
नागरिकांकडून ३३ प्रश्नांच्या स्वरूपात माहिती संकलित केली जाणार
जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने (HLO App) द्वारे होणार
नागरिकांची माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार
संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्तात जनगणना
प्रशासनाचे आवाहन :
नागरिकांनी प्रगणकांना योग्य व खरी माहिती द्यावी
उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रगणकांना सावलीत बसण्याची सोय करावी
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीनेच माहिती दिल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होणार
जनजागृती उपक्रम :
स्वगणना कशी कराल?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा