- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: ‘जय श्रीराम’ च्या घोषात, ढोल-ताशांचा गजरात, भगवा तोरण पताका आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाई सजलेल्या रस्त्यांवरून अकोला शहरात गुरुवार २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता श्री राजराजेश्वर मंदिरातून प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, टाळ-मृदंगाचा गजर आणि जय श्रीरामच्या घोषणांनी आणि डी जे साऊंडने अवघे शहर दणाणून गेले होते.
महानगरातील माजी आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या संकल्पनेनुसार सेवारत विश्व हिंदू परिषद-श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम नवमी निम्मित शहरातून भव्य शोभायात्रा निघते. गुरुवारी सायंकाळी अकोला शहराचे आरध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत विविध मंडळाचे धार्मिक सामाजिक देखावे सहभागी झाले होते. सजीव देखाव्यांनी शोभायात्रेचे शोभा अधिकच वाढविली. लाखो राम भक्तांच्या साक्षीने हा अभूतपूर्व सोहळा पार पडला.
श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, सुहासिनी धोत्रे, अर्चना शर्मा, मंजूषा सावरकर, शोभायात्रा समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा शर्मा, समितीचे अध्यक्ष अरुण शर्मा, राहुल राठी आदींनी पूजा व महाआरती केल्यानंतर शोभायात्रेला उत्साहात सुरुवात झाली. ही शोभायात्रा जय हिंद चौक, कोतवाली चौक, राम मंदिर, टिळक रोड, जुना कापड बाजार, जैन मंदिर मार्गे, गांधी चौकात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या २५ आकर्षक चित्ररथ, दिंड्यांनी भाविकांचे लक्ष वेधले. शोभायात्रेत महापुरुषांच्या वेशभूषेत अश्वांवर आरूढ झालेले चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या शोभायात्रेत आमदार वसंत खंडेलवाल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महिला व बालकल्याण सभापती आरती घोगलिया, नगरसेवक हर्षद भांबेरे, अमोल मोहोकार, गिरीश गोखले, नितीन ताकवाले, गिरीश जोशी, माजी महापौर मदन भरगड आदींनी सहभाग घेतला.
समितीच्या वतीने राम नवमी उत्सवाचा प्रारंभ हिंदू नववर्ष गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर सुरू करण्यात आला. शोभायात्रेने उत्सवाची सांगता करण्यात आली. उत्सवाचे आकर्षण म्हणजे यावर्षी आयोजकांनी भाविकांना लक्ष्मी नारायणच्या मूर्तींचे वाटप केले.
रामनवमी पर्वात समितीच्या वतीने दरवर्षी कोतवाली चौकात यावर्षी पंचवीस फुटी भगवान नरसिह व हिरण्यकश्यप वध झाकी तयार केली. ही 25 फुट उंच नरसिंह व हिरण्यकश्यपची विशाल झाकी बघण्यासाठी लाखो रामभक्त कोतवाली चौकात गर्दी केली होती. हा विहंगम देखावा बघण्याची पर्वणी विहीप- रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली.
शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा गोवर्धन शर्मा, अध्यक्ष अरुण शर्मा, विहिप महानगर अध्यक्ष राजू मंजुळकर, कोषाध्यक्ष राहुल राठी,गणेश काळकर, सुरज भगेवार, निलेश जोशी, गोपाल महाराज राजवैद्य, संजय दुबे, हरिओम पांडे, अँड श्याम वक्टे, निलेश पाठक ,मनमोहन दुबे, राहुल कानडे, प्रसाद देशपांडे, प्रकाश घोगलिया, संदिप वाणी ,बाळ बिडवई, मनीष बाछुका, नितीन जोशी, अजय शर्मा, प्रशांत अवचार, सतीश ढगे, सुमित शर्मा, प्रियेश शर्मा, कल्पेश खंडेलवाल, जुगल खंडेलवाल, मंगेश गीते, कमल तिवारी, संजय अग्रवाल, कपिल गुप्ता, सनी चावला, अश्विन शर्मा, हर्षद चाल्स, डॉ विजय शर्मा, अक्ष पटेल, संजय शर्मा, विक्की तिवारी, पवन शर्मा, नवनीत काछवाल, राहुल शर्मा, एड,सौरभ शर्मा, एड, गिरिराज शर्मा, अनिल शर्मा, डॉ विजय शर्मा, सिद्धार्थ शर्मा, धीरज खंडेलवाल, विलास अनासाने, नवीन गुप्ता, अर्चना शर्मा, पुष्पा वानखडे, चंदा शर्मा, सिमरन अम्मा, रेखा नालट, सरला देशमुख, कल्पना अडचुले, दिपाली वराडे, संगीता मानकर, प्रीती बुरकुटे, मनीषा देशपांडे, मीरा वानखडे, संतोषी शर्मा, मुक्ता पापडे, चित्रा फाफट, वैशाली शेगोकार, मुक्ता पुरी, सुनंदा गावंडे, अनिता डोंगरे, चित्रा खेलपांडे, आशा वळस्कर, दिपाली शिंदे, मालती रणपिसे, सुरेखा नबापुरे, गंगाबाई नबापुरे समवेत विहिप-रामनवमी शोभायात्रा समितीचे बहुसंख्य सेवाधारी यांनी परिश्रम घेतले.
श्रीरामनवमीनिमित्त विशाल शोभायात्रा; पालकमंत्र्यांचा सहभाग
राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज श्रीरामनवमीनिमित्त शहरात आयोजित भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन येथील मोठे श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले व पूजन केले.
अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिर परिसरातून शोभायात्रेला सुरूवात झाली. आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर, गिरीश जोशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शोभायात्रेत विविध संघटनांतर्फे देखावे, ढोलताशा पथके, भजनी मंडळ यांच्यासह हजारो भाविक सहभागी झाले होते.
पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन मोठे राम मंदिरात दर्शन घेतले व पूजन केले. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने आसमंत निनादून गेले होते. विविध मंडळांतर्फे ठिकठिकाणी स्वागत, भाविकांसाठी पेयजल आदी व्यवस्था करण्यात आली होती. विविध संघटनांतर्फे वाहनांवर रामायणातील प्रसंगांवर देखावे प्रदर्शित केले. सिटी कोतवाली चौकातील श्री नृसिंहावतार देखावा लक्षवेधी ठरला.
श्रीराम नवमी शोभायात्रा समिती, श्री जानकी वल्लभो मातृशक्ती सत्संग मंडळ व श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळ यांचेतर्फे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
श्रीरामनवमीच्या पावन पर्वावर जुने शहर येथील प्राचीन श्री विठ्ठल मंदिर येथे अतिशय मंगलमय वातावरणात व धार्मिक उल्हासात श्रीराम जन्मोत्सव पार पडला.
श्रीरामनवमी शोभयात्रा समितीचे अध्यक्ष अरुण शर्मा यांनी सपत्नीक विधिवत श्रीरामजन्माची पूजा केली. यावेळी जानकीवल्लभो मातृशक्ती सत्संग मंडळाच्या अर्चना कृष्णा शर्मा तसेच विठ्ठल मंदिर सप्ताह मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी, नितीन खोत, विशाल शिंदे यांचे सह परिसरातील बहुसंख्य माताभगिनी उपस्थित होत्या.
akola city
ram navmi
ram navmi 2026
ram navmi shobhayatra
ram navmi utsav
Shri Ram navmi
vishva hindu parishad
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा