- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 25 क्षय रोग रुग्णांच्या कुटुंबांना मिळणार धान्य किट
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महानगरातील माजी आ.स्व गोवर्धन शर्मा यांच्या संकल्पनेनुसार सेवारत विहीप-श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने श्रीराम नवमीची तयारी जोमात सुरू असून या नऊ दिवशीय उत्सवात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राम नवमी उत्सवाचा प्रारंभ बुधवार दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 4 वाजता खंडेलवाल भवन येथे श्रीराम नवमी शोभायात्रा समिती व जानकी वल्लभो मातृशक्तीच्या वतीने आयोजित भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम गजर गजाननाचा याद्वारे होणार असून यामध्ये कथक नृत्य व विविध भक्तीमय सादरीकरण व उल्लेखनीय सेवा देणाऱ्या 5 मंडळाचा सत्कार समारंभ मातृशक्ती च्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती विहीप- रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने सोमवारी इंद्रप्रस्थ टॉवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या उपक्रमात गुरुवार दि 19 मार्च या पावन गुडीपाडवा दिनी महानगरात ठीक ठिकाणी राम भक्तांच्या सुख समृद्धी साठी समितीच्या वतीने 50 हजार आकर्षक लक्ष्मीनारायण मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी साय 6 वाजता स्थानीक सिटी कोतवाली चौकात वृंदावन येथील लोक कलाकारांची भव्य कृष्णलीला नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि 21 मार्च रोजी साय 6 वाजता सिटी कोतवाली चौकात सांप्रदायिक वारकरी मंडळाच्या वतीने मंडळाचे 125 वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणून पावली सादर करणार आहेत.रविवार दि 22 मार्च रोजी साय 6 वाजता सिटी कोतवाली चौकात विविध भजनी मंडळाची संगीतमय भजने आयोजित करण्यात आली आहेत.सोमवार दि 23 मार्च रोजी महाकाल पथक द्वारा संगीतमय अध्यात्मिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.रामनवमी पर्वात समितीच्या वतीने दरवर्षी कोतवाली चौकात आयोजित होत असणाऱ्या झाकीत यावर्षी पंचवीस फुटी भगवान नरसिह व हिरण्यकश्यप वध झाकी सादर करण्यात येणार आहे.या झाकीचा प्रारंभ मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून ही 25 फुटी नरसिंह व हिरण्यकश्यपची विशाल झाकी गुरुवार दिनांक 26 मार्च पर्यंत राम भक्तांना बघण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लाखो रामभक्त महिला पुरुष ही झाकी बघण्यासाठी कोतवाली चौकात दरवर्षी गर्दी करीत असतात. यावर्षी हा विहंगम देखावा बघण्याची पर्वणी विहीप- रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली असून समस्त महिला पुरुष राम भक्तांनी या उपक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घेऊन रामनवमीचा महोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी रामनवमी शोभायात्रा समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा गोवर्धन शर्मा, अध्यक्ष अरुण शर्मा, विहिप महानगर अध्यक्ष राजू मंजुळकर, कोषाध्यक्ष राहुल राठी आदि मान्यवरानी उत्सवाची माहिती दिली. संचालन बाळकृष्ण बिडवई यांनी केले.
उत्सव यशस्वितेसाठी नविन गुप्ता, मनिष बछूका, संदिप वाणी, नितीन जोशी, डॉ.विजय शर्मा, बंटी कागलीवाल, शैलेश खरोटे, संजय दुबे, हरिओम पांडे, निलेश पाठक, गोपाल महाराज राजवैद्य, विलास अनासने, रामप्रकाश मिश्रा, गणेश काळकर, सुरज भगेवार, गोपाल महाराज राजवैद्य,ॲड. श्याम वक्टे, निलेश पाठक ,मनमोहन दुबे, राहुल कानडे, प्रसाद देशपांडे, प्रकाश घोगलिया, नितीन जोशी, अजय शर्मा, प्रशांत अवचार, सतीश ढगे, सुमित शर्मा, प्रियेश शर्मा, कल्पेश खंडेलवाल, जुगल खंडेलवाल, मंगेश गीते, कमल तिवारी, संजय अग्रवाल, कपिल गुप्ता, सनी चावला, अश्विन शर्मा, हर्षद चार्लस, अक्षय पटेल, संजय शर्मा, विक्की तिवारी, पवन शर्मा, नवनीत काछवाल, राहुल शर्मा, एड,सौरभ शर्मा, एड, गिरिराज शर्मा, अनिल शर्मा, डॉ विजय शर्मा, सिद्धार्थ शर्मा, धीरज खंडेलवाल, अर्चना शर्मा, पुष्पा वानखडे, चंदा शर्मा, सिमरन अम्मा, रेखा नालट, सरला देशमुख, कल्पना अडचुले, दिपाली वराडे, संगीता मानकर, प्रीती बुरकुटे, मनीषा देशपांडे, मीरा वानखडे, संतोषी शर्मा, मुक्ता पापडे, चित्रा फाफट, वैशाली शेगोकार, मुक्ता पुरी, सुनंदा गावंडे, अनिता डोंगरे, चित्रा खेलपांडे, आशा वळस्कर, दिपाली शिंदे, मालती रणपिसे, सुरेखा नबापुरे, गंगाबाई नबापुरे समवेत विहिप व रामनवमी शोभायात्रा समितीचे बहुसंख्य सेवाधारी परिश्रम घेत आहेत.
समिती सामजिक दायित्व म्हणून गरजूंना विविध प्रकारच्या सेवा प्रदान करीत असते. याच अनुषंगाने समितीच्या वतीने व शासनाच्या सहकार्याने समाजातील गरजू 25 क्षयरोग कुटुंबांना दर महिन्याला शिधा वाटप करण्यात येत असून या कुटुंबांची संख्या अधिक वाढविण्यात येणार असून समाजातील गरजू क्षयरोगी रुग्णांच्या कुटुंबियानी या संदर्भात समितीची संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
अकोला शहर
गुढी पाडवा
राम नवमी
शोभा यात्रा
akola city
gudhi padwa
laxmi narayan idol
ram navmi
shobha yatra
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा