- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
massive-fire-moving-car-akola: उड्डाण पुलावर धावत्या कारचा थरार; पाचही प्रवासी सुखरूप, वाहतूक थोडा वेळ खोळंबली
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील दक्षता नगर पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलावर चारचाकी वाहनाने (MH-O8-AN8927) अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गाडी रत्नागिरी येथील असून या वाहनात पाच प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, अचानक वाहनातून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कार मधून प्रवास करणारे प्रवासी कुटुंब वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील हे असून दवाखान्याच्या कामानिमित्त अकोल्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण वाहन जळून खाक झाले होते.
दरम्यान, या आगीमुळे उड्डाण पुलावरील वाहतूक थोडा वेळ खोलंबिली होती.
Akola
akola city
car
Dakshata Nagar
Flyover
four wheeler
Massive Fire
Moving Car
petrol pump
Ratnagiri
vehicle
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा