negotiable-instruments-act-: धनादेश अनादरित प्रकरणी आरोपीस सहा महिने कारावासाची शिक्षा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: दहावे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला एन. डी. जाधव, यांनी दिनांक १६.०२.२०२६ रोजी आरोपी संजय मनोहर खाचणे (वय अंदाजे ४६ वर्ष, गजानन वाटीका, येवता रोड, मलकापूर अकोला, जिल्हा अकोला,) याला कलम १३८ निगोशिएबल इंन्सटुमेंट ॲक्ट अंतर्गत दोषी ठरवुन शिक्षा सुनावली आहे.


आरोपी संजय मनोहर खाचने याने निशांत मल्टी स्टेट कॉ-ऑप. केडीट सोसायटी लि. मुख्य शाखा अकोला यांच्याकडून रक्कम रुपये ०५,०००,००/-चे कर्ज उपलब्ध करुन घेतले होते व त्यानंतर आरोपीने कर्ज रकमेची परतफेड कबुल केल्याप्रमाणे केली नाही व संस्थेने कर्जाच्या परतफेडीकरीता मागणी केली असता आरोपीने संस्थेस थकीत कर्ज रक्कम परतफेडी करीता रक्कम रुपये १,०३,०००/- रुपयाचा स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा पी. के. व्ही. अकोला चा धनादेश दिला होता. परंतु दिलेला धनादेश आरोपीच्या खात्यामध्ये अपुरी रक्कम असल्या कारणाने अनादरीत झाल्यामुळे संस्थेने आरोपी विरुध्द कलम १३८ निगोशिएबल इंन्सटुमेंट ॲक्ट अंतर्गत फिर्याद दाखल केली. सदरहू फिर्यादीमध्ये आरोपीने असा बचाव घेतला होता की, त्याने कर्ज रक्कम भरली आहे. परंतु झालेल्या साक्ष पुराव्यावरुन न्यायालयाने आरोपीस कलम १३८ निगोशिएबल इंन्सटुमेंट ॲक्ट अंतर्गत सहा महिने कारावासाची शिक्षा व दिलेल्या धनादेशाच्या दुप्पट रक्कम रुपये २,०६,०००/- दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच या दंड रक्कमेपैकी रुपये २,००,०००/- फिर्यादी संस्थेस नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.


सदर प्रकरणात फिर्यादी निशांत संस्थेतर्फे ॲड. शाम खोटरे व ॲड. अश्विन काळे यांनी फिर्यादी पक्षाची बाजु मांडली व आरोपीची बाजू ॲड. सुशिल तलरेजा यांनी मांडली.

टिप्पण्या