- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
court-update-bail-granted-ngp: जिल्हा सत्र न्यायालयाने पोक्सो गुन्ह्यात जामीन नाकारलेल्या आरोपीला उच्च न्यायालयात दिलासा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्हा सत्र न्यायालयाने पोक्सो गुन्ह्यात जामीन नाकारलेल्या आरोपीला उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने जामीन दिल्याने आरोपी व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. आकाश हिवराळे यांनी मांडली.
सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये 22 जुलै 2025 रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 78, 115(2), 351(2)(3), पोक्सो कायदा 8 अनव्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार आरोप असलेले स्वराज वाहुरवाघ यांना अटक करून कारागृहात ठेवण्यात आले. सदर गुन्ह्यात विद्यमान तीसरे जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय अकोला यांनी आरोपीचा दोषारोप दाखल करण्यापूर्वी व दोषारोप दाखल झाल्यावर दोन्ही वेळा जमीन अर्ज नामंजूर केला. यावेळी आरोप असलेले स्वराज स्वदेश वाहुरवाघ यांच्या वतीने अधिवक्ता ॲड. आकाश गुलाबराव हिवराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामीन अर्ज केला.
सदर गुन्हा हा प्रेमप्रकरणातून घडला असून, आरोपीला जामीन द्यावा, असा प्रभावी युक्तिवाद आरोपीतर्फे ॲड.आकाश गुलाबराव हिवराळे यांनी केला. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीस जामीन मंजुर केला.
अकोला बातमी
akola court
crime news
high court
High Court
legal news
nagpur bench
POCSO
Sessions Court
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा