political-violence-bjp-akola-: शरद तुरकर जीवघेणा हल्ला प्रकरण: पराभवाचा राग मनात धरून पॅनलमधील उमेदवारानेच केला हल्ला; मुख्य आरोपी अटकेत

भाजप नगरसेवकावर जीवघेणा हल्ला प्रकरण





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला | नीलिमा शिंगणे जगड 

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राजकीय वैरातून झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मतमोजणीच्या दिवशी भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद श्रीराम तुरकर यांच्यावर त्यांच्या पॅनलमधीलच पराभूत उमेदवार नितीन नरेश राऊत याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महानगरपालिका निवडणुकीत शरद तुरकर यांचा विजय झाला, मात्र त्याच पॅनलमधील नितीन राऊत यांचा पराभव झाला. या पराभवाचा राग मनात धरून आरोपी नितीन राऊत याने शरद तुरकर यांना आपल्या कार्यालयाजवळ बोलावले. त्यानंतर आरोपीने गैरकायदेशीर जमाव गोळा करून शरद तुरकर यांच्या डोक्यात लाठी व दगडाने वार करत गंभीर जखमी केले.

यावेळी आरोपींसोबत असलेल्या इतर व्यक्तींनी लोखंडी तराजूनेही शरद तुरकर यांच्यावर हल्ला केला. भांडण सोडविण्यासाठी आलेले त्यांचे भाऊ भरत श्रीराम तुरकर यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.


गुन्हा दाखल व तपास


या प्रकरणी पोलीस स्टेशन अकोट फाईल, अकोला येथे गुन्हा क्रमांक 49/26 अंतर्गत बीएनएस व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


फरार आरोपीचा थरारक शोध


आरोपी नितीन राऊत हा छत्रपती संभाजीनगर, कारंजा, अमरावती, नागपूर, बाळापूर, शेगाव अशा विविध ठिकाणी लपून राहत होता. सतत ठिकाणे व मोबाईल सिमकार्ड बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र तो अकोला येथील रेल्वे स्टेशन चौकातील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


पोलिसांची शिताफी


माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने मुख्य आरोपी नितीन राऊत व सहआरोपी शेख सोहेल शेख चांद याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.


ठळक मुद्दे News Highlights 


एकाच पॅनलमधील उमेदवारांमध्ये निवडणुकीनंतर वैर

पराभवाच्या रागातून भाजप नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

लाठी, दगड व लोखंडी तराजूने हल्ला

भावालाही मारहाण व जीवे मारण्याची धमकी

अनेक जिल्ह्यांत फरार असलेला मुख्य आरोपी अखेर अटकेत

अकोट फाईल पोलिसांची यशस्वी कामगिरी


टिप्पण्या