court-update-crime-bank-scam : निशांत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटी बँक मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : फिक्स डिपॉझिटच्या पावत्या परस्पर विड्रॉल प्रकरणी शहरातील नामांकित निशांत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश विद्यमान चवथे सह दिवाणी न्यायाधीश अकोला यांनी दिले आहेत.
सदर प्रकरणातील फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांनी निशांत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये त्यांच्या भविष्यासाठी फिक्स डिपॉझिट केले होते. फिर्यादीला फिक्स डिपॉझिटची गरज भासली असता फिर्यादी निशांत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी गाठली. पण, सोसायटीने त्यांना न सांगताच फिक्स डिपॉझिटच्या पावत्या विड्रॉल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, सोसायटीतर्फे त्यांना असभ्य वागणूक मिळाल्याचा आरोप पीडीत फिर्यादी यांनी केला. त्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता त्यांच्या तक्रारीवर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे फिर्यादीने विद्यमान न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर तक्रारकर्त्याची बाजू ऐकून त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांची पडताळणी केली. व फिर्यादीसोबत झालेल्या अन्यायावर विद्यमान न्यायालयाने दाद देत निशांत मल्टीस्टेट सोसायटी अकोला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात ॲड .सुमित बजाज, ॲड . वर्षा सदार व ॲड. अमोल भोसले यांनी फिर्यादीची प्रभावीपणे बाजू मांडली.
या निर्णयामुळे फिर्यादीची केलेली फसवणूक निशांत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला महागात पडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा