orthopedic-repair-camp-akola: "सक्षम" आणि "डॉ.रा.ना. चौधरी ट्रस्ट" च्या अस्थीव्यंग दुरुस्ती शिबिराची नोंदणी सुरू




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आपल्या निष्ठावंत सेवेने अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा राष्ट्रीय सेवयसेवक संघ मानव कल्याणाचे कार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतो. या संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त दिव्यांगांच्या उत्थानासाठी कार्यरत "सक्षम" आणी "डॉ. रा.ना. चौधरी ट्रस्ट" अकोला यांच्या वतीने रविवार ७ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १:३० पर्यंत चौधरी हॉस्पीटल, सिव्हील लाइन्स, अकोला येथे अस्थीव्यंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 


विशेष म्हणजे चिमुकल्या पासून वय १८ पर्यंत सर्व लहान मुला-मुलींचे अस्थीव्यंग या शिबिरात तपासले जातील. कठीण व्यंगासाठी अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्याचे प्रयोजन केले असून अत्यंत गरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात येऊन इतर अनेक रुग्णांसाठी माफक दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती चौधरी हॉस्पीटल, सिव्हील लाइन्स येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 


यावेळी डॉ. रा.ना. चौधरी ट्रस्टचे डॉ. नानासाहेब चौधरी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. 



अत्याधुनिक व गाजलेल्या इलिझारोव तंत्र पद्धतीचा उपयोग करून हाता-पायाचे व्यंग दुरुस्त करणे, लांबी वाढवणे असे अतीशय दुर्मिळ व कुशल शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन आहे. शिबीर जरी एक दिवसाचे असले तरी तपासणी नंतर निवडलेल्या रुग्णांचा अस्थीव्यंग पूर्ण दुरुस्त होईपर्यंत मागोवा (follow-up) घेण्यात येईल. रुग्णांना पक्की तारीख देऊन शस्त्रक्रिया व्यवस्थित रित्या केली जाईल व फेरतपासणी साठी निश्चित वेळ दिली जाईल. 


मानव सेवा हीच माधव सेवा" हे ब्रिदवाक्य ध्यानी धरून काम करणाऱ्या चौधरी हॉस्पिटलचा ९८ वर्षाचा इतिहास व अनुभव आहे. डॉ. नानासाहेव चौधरी, MS, FRCS, FRCSE यांच्या प्रेरणे मुळे हे शिबीर आयोजित झाले आहे. अखंड भारतातूनच नव्हे तर चार खंडा मध्ये ख्यातनम अस्थीव्यंग दुरुस्ती रुग्णालयांमधे चौधरी हॉस्पिटल, अकोलाची गणना केली जाते. 



डॉ. मिलींद चौधरी यांनी इलिझारोव तंत्रपद्धती १९८९ साली भारतात प्रथम आणली व सातत्याने ३६ वर्ष हे काम करत आहेत. 


शिबीरात मुंबईच्या बी.जे.वाडिया बाल रुग्णालयाच्या प्रमुख सर्जन डॉ. रूजूता मेहता यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात येईल व त्या उपस्थित राहून रूग्ण तपासणी करणार आहेत. अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व प्रचंड अनुभव असलेल्या डॉ. रुजूता मेहता भारतातील मोजक्या प्रथम महिला ऑर्थोपेडिक सर्जन पैकी आहेत. 


चौधरी हॉस्पिटलची चौथी पिढी हे काम पुढे नेण्यासाठी तत्पर आहे. डॉ. इशानी मिलींद चौधरी यांचे शिक्षण मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालय व पुण्याच्या संचेती हॉस्पिटल मधून ऑर्थोपेडिक सर्जरी मधे प्रशिक्षण झाले. नंतर फ्लोरिडा. यू.एस.ए स्थित जगविख्यात डॉ. ड्रॉर पेली, यांच्या जगातील सर्वात अत्याधुनिक जन्मजात व्यंग दुरुस्ती केंद्रात प्रशिक्षण झाले. जपान मधे कानाझावा युनिवर्सिटी मधे देखील प्रशिक्षण झाले. त्या गेली पाच वर्षे लहान मुलांच्या अस्थिव्यंग दुरुस्तीचे काम डॉ. मिलींद चौधरी सोबत संभाळत आहे. 


"सक्षम" ही दिव्यांगांच्या कल्याणार्थ निष्ठेने काम करणारी राष्ट्रीय संघटना आहे. आपण करीत असलेली सेवा खऱ्या अर्थाने गरजूंच्या पदरात पडाव्या हेतूने या दोन्ही संस्थाने हे शिबीर आयोजिले आहे. 


शिबिरा आधी रुग्णांची नाव नोंदणी खालील मोबाईल क्रमांक 74000 09096 वर करण्याचे आवाहन "सक्षम" चे निकेश गुप्ता तथा डॉ.रा.ना. चौधरी ट्रस्टचे डॉ. नानासाहेब चौधरी यांनी केले आहे.






टिप्पण्या