भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, वनपर्यटन, नौकाविहार, साहसी खेळ अश्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमसह आदिम संस्कृतीचे महोत्सवात दर्शन घडणार आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणां सज्ज होत असून,स्थानिक नागरिकांचे देखील सहकार्य लाभत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले.
नरनाळा महोत्सव निमित्त जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज सोमवार 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी आयोजन संदर्भात प्रसाारमाध्यमांशी चर्चा केली.
पर्यटक, निसर्गमित्र व वनप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला नरनाळा पर्यटन महोत्सव 13 वर्षांनंतर पुन्हा आयोजित करण्यात येत असल्याचे वर्षा मीना म्हणाल्या. मेळघाटचे समृद्ध वनवैभव, ऐतिहासिक नरनाळा किल्ला, आदिम संस्कृती व परंपरांचे दर्शन महोत्सवातून घडणार असून, नौकाविहार, सफारी, आदिवासी नृत्यकला सादरीकरण, पक्षीनिरीक्षण, गड भटकंती, गिर्यारोहण आदी साहसी खेळ, छायाचित्र प्रदर्शन याबरोबरच अनेकविध सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. नौकाविहार, वनपर्यटन सह पॅरासेलिंग व साहसी खेळांचा महोत्सवात समावेश राहणार आहे. वन्यजीवनाची सफर घडविण्याबरोबरच विविध कलाप्रदर्शनातून सातपुड्याच्या संस्कृतीचे दर्शन महोत्सवातून घडणार आहे. यासाठी सुसज्ज दालने, दर्जेदार उपक्रमांची आखणी करण्यात येत असल्याचे मीना यांनी सांगितले. महोत्सवाच्या दृष्टीने आवश्यक रस्तेदुरूस्ती, बस, इतर सुविधांची तयारी सुरू असून महसूल, वनविभाग, पाटबंधारे विभाग यासह सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम करीत असल्याचे जिल्हाधिकारी मीना यांनी सांगितले.
दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन करीत महोत्सव लोक सहभागातून निश्चितच यशस्वी पार पडेल, अशी आशा जिल्हाधिकारी मीना यांनी यावेळी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा