court-news-dishonor-cheque: धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला तिन महिन्याची शिक्षा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला तिन महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ३ अकोला, डि. एस. कोलते यांनी १ डिसेंबर रोजी केस क्रमांक ३७६५/२०१६ या प्रकरणात आरोपी शैलेष सुरेश शिंदे, (रा. शुक्रवारपेठ, इंदिरा चौक, बाहेती गल्ली, वाशिम) याला कलम १३८ एन. आय. ॲक्ट मध्ये दोषी ठरविले व त्याला तिन महिने साधा कारावास तसेच ६३,७९७/- रूपये नुकसान भरपाई व नुकसान भरपाई न भरल्यास १ महीन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.


घटनेची हकीकत अशी की. फिर्यादी माया नंदकिशोर जवळकार ही निर्मल मोती एजन्सी नावाने व्यवसाय करत होती. तसेच आरोपी हा शांताई नारी शृंगार जनरल आणि कटलरी दुकान चालवित होता. फिर्यादीने आरोपीला दुकानाकरीता माल पाठविला होता. त्या मालाच्या परतफेडीपोटी आरोपीने फिर्यादीला ६३,७९७/-रूपयाचा धनादेश दि. २०.०९.२०१६ रोजी पंजाब नॅशनल बँक शाखा वाशिमचा दिला होता. सदरचा धनादेश अनादरित झाल्यामुळे फिर्यादीने अकोला येथील न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.


सदरहु प्रकरणामध्ये फिर्यादीचे साक्ष झाली. फिर्यादी व आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद व नोंदलेल्या साक्षी पुराव्यावरुन आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द झाला व त्यानुसार न्यायालयाने आरोपी शैलेष सुरेश शिंदे, रा. शुक्रवारपेठ, इंदिरा चौक, बाहेती गल्ली, वाशिम याला कलम १३८ एन. आय. ॲक्ट मध्ये दोषी ठरविले व त्याला तिन महिने साधा कारावास तसेच ६३,७९७/- रूपये नुकसान भरपाई व नुकसान भरपाई न भरल्यास १ महीन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.


सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. राजेश आकोटकर यांनी बाजु मांडली.

टिप्पण्या