akola-municipal-election-bjp: अकोला महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 20 डिसेंबरला अकोल्यात; भाजपची रणनीती बैठक

संग्रहित छायाचित्र 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारीला वेग दिला असून, राज्याचे महसूल मंत्री व निवडणूक प्रभारी नामदार चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, दि. 20 डिसेंबर रोजी अकोल्यात दाखल होत आहेत. राज राजेश्वर नगरीतील हॉटेल सिटी स्पोर्ट येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण रणनीती बैठक आयोजित करण्यात आली आहे.




या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची भूमिका, रणनीती, कार्यपद्धती तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी व सूचनांवर सविस्तर चर्चा होणार आहे.


मर्यादित पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश


भाजपच्या या बैठकीस जबाबदारी असलेल्या प्रमुख 156 पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण देण्यात आले असून, नोंदणी केलेल्या व निमंत्रित पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत निवडणुकीचा मंत्र देणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी दिली.


या मान्यवरांची उपस्थिती


या महत्त्वपूर्ण बैठकीस पुढील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत 


भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर


पालकमंत्री ऍड. आकाश फुंडकर


खासदार अनुप धोत्रे


संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर


आमदार वसंत खंडेलवाल


आमदार हरीश पिंपळे


आमदार प्रकाश भारसाकले


जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर


जयंत मसने, किशोर पाटील, कृष्णा शर्मा आदी पदाधिकारी



महानगरपालिका निवडणुकीसाठी दिशा ठरणार बैठक


अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून, याच बैठकीतून भाजपची निवडणूक रणनिती ठरवली जाणार असल्याचे विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.


ठळक मुद्दे (News Highlights)


20 डिसेंबर रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात


हॉटेल सिटी स्पोर्ट येथे भाजपची रणनीती बैठक


केवळ 156 निमंत्रित पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश


महानगरपालिका निवडणुकीसाठी दिशा ठरणार बैठक


राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख नेत्यांची उपस्थिती

टिप्पण्या