nagar-parishad-election-akot: अकोला BJP मध्ये एकतेचा सूर!मनोरमा बोडखे यांनी माघार घेत पूनम भगत यांना दिला पाठिंबा




ठळक मुद्दे 


प्रभाग 13अ मध्ये BJP अधिकृत उमेदवार सौभाग्यवती पूनम अविनाश भगत यांना मोठा पाठिंबा

 

मनोरमा समाधान बोडखे यांनी उमेदवारीतून अधिकृतरीत्या माघार


आमदार रणधीर सावरकर यांच्या विनंतीला मान


जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडून बोडखे यांचे अभिनंदन


प्रभागातील सर्व BJP उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन 


जिल्ह्यात BJP कार्यकर्त्यांमध्ये एकता दृढ


२ डिसेंबरला अधिकृत उमेदवार विजय मिळवतील, असा विश्वास : राजेश नागमते





भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड 
अकोला: भारतीय जनता पक्षाच्या अकोट प्रभाग 13अ मधील राजकारणाला आज नवा वेग मिळाला आहे. BJP उमेदवार पूनम अविनाश भगत यांच्या समर्थनात पक्षातील सक्रीय नेत्या मनोरमा समाधान बोडखे यांनी आपली उमेदवारी मागे घेत पक्षाच्या अधिकृत निर्णयाला मान दिली आहे.

आमदार रणधीर सावरकर यांच्या विनंतीनंतर बोडखे यांनी पक्षाची एकजूट टिकवण्यासाठी आणि अधिकृत उमेदवारांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी आमदार सावरकर यांना पत्र देत पूनम भगत यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला असून प्रभागातील सर्व BJP उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.


या निर्णयानंतर जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर आणि आमदार प्रकाश  भारसाकळे यांनी बोडखे यांच्या भूमिकेचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.


दरम्यान, BJP सरचिटणीस राजेश नागमते यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याने जिल्ह्यात एकतेची नवी सुरुवात झाली आहे. दोन डिसेंबरला भारतीय जनता पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.





News Points 


Akola News, BJP, Poonam Bhagat, Manorama Bodkhe, Randhir Sawarkar, Akola Elections, Nagarparishad Election, Ward 13A Political News Maharashtra Politics BJP Unity Election2025



टिप्पण्या