bibbat-leopard-in-akola-city-: अकोला – न्यू तापडिया नगरात बिबट्याचा कहर; घरात घुसून काच फोडत पळाला, रहिवाशांमध्ये भीतीचे सावट





ठळक मुद्दा

आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ; वनविभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात आज सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. सकाळी सुमारे नऊच्या सुमारास पोलीस कर्मचारी विलास बंकावार यांच्या घरात बिबट्याने काच फोडून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, बंकावार यांच्या सासू घरातील पायरीवरून वर जात असताना त्यांना पायरीतच बिबट झोपलेल्या अवस्थेत दिसला. महिलेची चाहूल लागताच बिबट्याने अचानक उसळी मारत थेट काच फोडून घराबाहेर पळ काढला. सुदैवाने या संपूर्ण प्रकारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नागरिकांनी वनविभागाने तातडीने लक्ष घालून बिबट्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


दरम्यान, वन विभाग कडून अद्यापही घटनेची पुष्टी करण्यात आलेली नाही, हे येथे उल्लेखनीय.


ठळक मुद्दे (Key Points)


न्यू तापडिया नगरात बिबट दिसल्याने भीतीचे सावट 


पोलीस कर्मचारी विलास बंकावार यांच्या घरात बिबट घुसल्याची घटना


बिबटाने काच फोडून घराबाहेर पळ काढला


महिलेची चाहूल लागताच बिबट अचानक धावला


नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, मुलांना बाहेर न सोडण्याचे आवाहन


वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी






News Points 


Akola News 

Akola City 

New Tapadia Nagar 

Bibbat 

Leopard In Akola 

Wildlife Rescue 

Forest Department 

Breaking News 

Safety Alert 

Maharashtra News




टिप्पण्या