midc-akola-truck-pesticide-theft-case: ट्रकमधून लाखोंचा पेस्टीसाइड गायब; पोलीस तपासात दिरंगाई, माल गैरकायदेशीर बाजारात गेल्यास समाजास मोठा धोका!
ठळक मुद्दे
ट्रकमधून चंद्रपूर रवाना झालेले पेस्टीसाइटस माल चोरी
पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप
माल गैरहाती लागल्यास लोकांच्या जीविताला धोका; उद्योजक व्यापारी वर्गात चिंता
एवढा मोठा रकमेची पेस्टिसाइड चोरीला जाण्याची ही कदाचित पहिलीच घटना
गांभीर्य ओळखून तपासाला गती द्यावी, उद्योजक व्यापारी वर्गाची अपेक्षा
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: एमआयडीसी अकोला येथून चंद्रपूरकडे निघालेल्या ट्रक क्रमांक MH-27-BX-6290 मधून अज्ञात चोरट्यांनी 28,62,246 रुपये मूल्याच्या पेस्टीसाइडसचा मोठा माल गायब झाला आहे. याबाबत ट्रान्सपोर्ट व्यवसायिक सैयद अकील सय्यद बिस्मिल्ला यांनी पोलीस ठाण्यात रितसर जबानी तक्रार दिली आहे. मात्र महिना उलटूनही गुन्हेगार सापडत नसल्याने पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
सैयद अकील यांच्या तक्रारीनुसार, 02/08/2025 रोजी पूजा रोड लाइन्स (एमआयडीसी क्र.4, अकोला) येथून ट्रक (MH-27-BX-6290) मध्ये UPL Sutainable Agri Solutions आणि इतर कंपन्यांचे एकूण 187 पॅकेटेसह महत्त्वाचे पेस्टीसाइटस कृषी उत्पादने माल भरून पाठविण्यासाठी लावण्यात आले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ट्रक देवाण - घेवाण करून चंद्रपूरसाठी निघाला. परंतु देहुगावजवळ पोहोचल्यानंतर ट्रक चालकांनी बघितले की, ट्रकच्या मागील बाजूची दोरी कापलेली व ताडपत्री फाटलेली आहे. यानंतर तपासात मालाचे अनेक बॉक्स गायब असल्याचे आढळले. चोरी गेलेला मालाचा शोध घेण्याचा फिर्यादीने प्रयत्न केला. मात्र आढळून आला नाही. शेवटी फिर्यादीने पोलीस स्टेशनकडे धाव घेवून 15 ऑगस्ट 2025 रोजी MIDC पोलीस स्टेशन अकोला येथे रीतसर तक्रार नोंदविली.
तक्रारनुसार, चोरुन नेण्यात आलेले माल
UPL Sutainable Agri Solutions वेगवेगळ्या LR व इनव्हॉइस मधील अनेक बॉक्स रु. 58,361, 5,79,108, 1,75,414, 15,75,749 इत्यादी. SWAL CORPORATION काही बॉक्स रू 4,04,676 व इतर इनव्हॉइस मधील रु. 68,938. एकूण चोरी गेलेला माल असा एकूण रुपये 28,62,246.
तक्रारदाराचे म्हणणे
सैयद अकील यांनी तक्रार नोंदविताना, एमआयडीसी अकोला येथील पुजा ट्रान्सपोर्टच्या परिसरात ट्रक असताना माल चोरी झाल्याचे सांगितलेले आहे. पोलिसात तक्रार देवून आज महिना झाला आहे. मात्र अद्यापही कुठलीच कारवाई झाली नाही. ते म्हणाले, “चोरीचा माल विकला गेला किंवा चुकीच्या हातात सापडला तर सामान्य जनता व शेती संदर्भातील लोकांना मोठा धोका होऊ शकतो. मात्र कुंपणच शेत खात असेल तर दाद मागायची कुणाकडे?” अश्या शब्दात तक्रारदार यांनी गंभीर आरोप केला आहे.
लोकांचे आरोग्य व पर्यावरणास धोका
या प्रकरणातील पेस्टीसाइटस हे केवळ आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे नाहीत. तर चुकीच्या हातात किंवा गैरकायदेशीर बाजारात गेल्यास लोकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच तक्रारदाराचे सतर्क संदेश स्पष्ट आहेत. “चोरीचा माल चुकीच्या व्यक्तीच्या हातात सापडल्यास लोकांच्या जीवितासही हानी होऊ शकते.” त्यामुळे पोलीस तपास लवकर आणि प्रभावीपणे करणे गरजेचे आहे.
नागरिकांना आवाहन
स्थानिक शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी अशा प्रकारच्या केमिकल मालाविषयी सावधगिरी बाळगावी आणि अनधिकृत विक्री आढळल्यास त्वरित पोलिसांना सूचना करावी, असे आवाहन तक्रारदार यांनी केले आहे.
मोठया प्रमाणात पेस्टिसाइड चोरीला जाण्याची पहिलीच घटना!
दरम्यान, एवढा मोठा रकमेची पेस्टिसाइड चोरीला जाण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी, तरी मात्र पोलिसांना याचे गांभीर्य नसल्याच त्यांच्याद्वारे सुरू असलेल्या तपासाच्या गतीने दिसून येत आहे. तर फिर्यादीला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. मात्र तपास कोणत्या दिशेने आणि कसा सुरू आहे, याची माहिती देण्यात येत नाही. एकीकडे अकोला पोलीस विभागाला नव्या उमेदीचे नेतृत्व लाभले असून, ऑपरेशन प्रहार द्वारा अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. एवढा मोठया प्रमाणात पेस्टिसाइड माल चोरीला गेले आहे. मात्र याचे गांभीर्य प्रशासनाने ओळखले नसल्याचे दिसून येत असल्याचे संबंधित उद्योजक व्यापारी यांनी म्हंटले आहे. जर हा माल गैरहाती लागल्यास समाज विघातक ठरेल. कुठलाही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी पोलिसांनी चोरीस गेलेला पेस्टिसाइड माल त्वरित शोधून काढून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्याव्या, एवढी माफक अपेक्षा तक्रारदार सह संबंधित उद्योजक व्यापारी यांनी व्यक्त केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा