- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
police-custody-death-case-akt: बहुचर्चित गोवर्धन हरमकार पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण; आरोपी निलंबित पोलीस शिपाईचा जमानत अर्ज न्यायलयाने फेटाळला
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बहुचर्चित अकोट शहर पोलीस स्टेशन मधील गोवर्धन हरमकार पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस शिपाई रवि सदांशिवचा जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनचे फाईल वरील अपराध क्रमांक 169/2024, कलम 302, 166, 201 भारतीय दंड विधान या मधील आरोपी पोलीस शिपाई रवि सदांशिव (वय 35 वर्ष, निलंबित पोलीस शिपाई, अकोट शहर पोलीस स्टेशन) याने मृतक गोवर्धन हरमकार याचे पोलीस कोठडी मधील झालेल्या मृत्यू प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज फेटाळला आहे.
या प्रकरणात सी.आय.डी. पोलीस उपअधिक्षक तुकाराम निंबाळकर अमरावती यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून, हे आरोपी अकोला कारागृहामध्ये 16 ऑक्टोबर 2024 पासून बंदीस्त आहे. आरोपी रवी सदांशिव याने या प्रकरणातील गुन्हयाशी माझा काहीही संबंध नसुन व या गुन्हयात गोवण्यात आले, या मुददयावर जमानत अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात लेखी उत्तर व युक्तीवाद केला.
युक्तिवादातील महत्वाचे मुद्दे
आरोपीच्या गुन्हयातील अर्जदार आरोपी 10 ते 13 जानेवारी 2024 व 15 ते 16 जानेवारी 2024 रोजी पर्यंत गुन्हे प्रगटीकरण पथकामधे कार्यरत असल्याचे ड्युटी तक्त्यावरुन दिसुन येते.
या प्रकरणात मृतक गोवर्धनचे काका यांनी जी फिर्याद दिली आहे त्यामध्ये नमूद केले आहे की, या प्रकरणातील आरोपी असलेल्या पोलिसांनी मृतक गोवर्धनला 15 जानेवारी 2024 रोजी अकोट शहर पोलिस स्टेशनला एका प्रकरणात संशयावरून अटक करून आणले होते. व 16 जानेवारी 2024 रोजी गोवर्धनला रात्री 08 ते 09 चे दरम्यान सुकळी या गावी आणले होते. व 17 जानेवारी 2024 रोजी उपचारादरम्यान विघ्नहर्ता हॉस्पीटल येथे गोवर्धनचा मृत्यु झाला.
फिर्यादी व इतर प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांनी सदर प्रकरणातील आरोपी असलेल्या पोलिसांनी मयत गोवर्धन हरमकार यास मारहाण केल्याचे बयानात सांगितले आहे.
मृतकाच्या शवविच्छेदन अहवालामधे 25 जखमा मृतकाच्या शरीरावर असल्याबाबत उल्लेख असून मरणाचे कारण हे या सर्व जखमामुळे मृत्यु झाला असे शवविच्छेदन अहवालामधे नमुद करण्यात आले आहे.
अर्जदार आरोपी हा पोलीस कर्मचारी असल्याने त्याचे भितीने नमुद गुन्हयातील साक्षीदार हे साक्ष देण्यास पुढे येणार नाही. तसेच हा आरोपी गुन्हयातील साक्षादारांवर दबाव आणु शकतो.
सदरचा खटला हा सर्व आरोपींना कारागृहात ठेवुनच सरकार पक्ष जलद गतीने चालविण्यास तयार आहे. म्हणुन आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा, असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला.
दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायलयाने आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर केलेला आहे.
Akola crime
Akot Court
Akot crime
bail application
Court news
death case
Govardhan Haramkar
police constable
police custody
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा