akola-rain-update-electrocute: विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर एक गंभीर; जुने शहरातील घटना




ठळक मुद्दे

आ. साजिद खान पठान यांची सर्वोपचार रुग्णालयात धाव 


घटनेस महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार- आ. पठाण 



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जुन्या शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात पावसादरम्यान विजेचा धक्का लागून दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळताच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठान यांनी तात्काळ अकोला जीएमसी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. तर यावेळी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. 




याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी जुने शहर परिसरातील सोनटक्के प्लॉट याठिकाणी कामावरून परतत असलेल्या दोन युवकांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 




सैय्यद समीर सैय्यद अय्युब ( वय २९ ) वर्ष असे मृतकाचे नाव असून मो. असलम मो. अनिस असे जखमीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तर यावेळी जखमींना योग्य उपचार व आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार पठान यांनी संबंधित जीएमसी अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या. तसेच पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. जखमी युवकाला लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे.






महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर? 


शुक्रवारी घडलेल्या अपघाताने पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या विद्युत तारेने ही घटना घडली असून याला महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचे टीका आ. पठाण यांनी यावेळी केली.

टिप्पण्या