- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आषाढ कृष्ण एकादशी म्हणजेच कामिका एकादशीच्या दिवशी जुने शहरातील पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
या मंदिराला ३२१ वर्ष पूर्ण होवून ३२२ व्या वर्षात पदार्पण झाले. या निमित्ताने मंदिरामध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळाच्या कार्यक्रम दिवसभर विविध महिला भजनी मंडळाच्या व भक्ती संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विठ्ठल नाम जप कार्यक्रम ह. भ. प. श्री संतोष पिसे पाटील व सहकारी यांचा संपन्न झाला, अतिशय भक्तीने रंगलेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. सर्व भाविक विठ्ठलनामात तल्लीन झाले होते.
यावेळी जेष्ठ महिला मार्गदर्शक सुनंदा देशपांडे, मंडळाचे सल्लागार विधिज्ञ अंकुश जोशी तसेच बालगोपाल विठ्ठल नामजप विजेते भक्ती किशोर कावरे , ईवेश खवले, राघव पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीस औक्षवण करून व आतिशबाजीने परिसर दुमदुमून गेला, त:पश्यात महाआरती होऊन प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या पुरातन मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते मंडळाचे सर्व सेवा अधिकारी श्री कृष्णा गोवर्धन शर्मा व व्यवस्थापक रमेश अलकरी यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकारिणी सदस्य यांच्या प्रयत्नाने सर्व कार्यक्रम भक्तीभावात व उत्साहात पार पडत असतात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा