road-accident-car-hits-bike-akl: कारची दुचाकीला धडक ; दोन ठार, एक जखमी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पिंजर ते बार्शीटाकळी रोडवरील उजळेश्वर अजनी फाट्याजवळ काल सायंकाळी कार आणि दुचाकीची धडक लागून अपघात घडला. या भीषण अपघातात दोन ठार तर एक किरकोळ जखमी झाला आहे.


पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची कार्य तत्परता काॅल येताच अवघ्या विस मिनटातच रुग्णवाहिकेसह टीम घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना मदत केली.


24 जुलै 2025 रोजी सायंकाळी पिंजर ते बार्शीटाकळी रोडवरील उजळेश्वर अजनी फाट्यावर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वारांना जबर धडक बसुन ते फेकल्या गेल्याची माहीती पिंजर येथील सचिन उंबरकार यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन पथकाच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना दिली. 



माहीती मिळताच पथकाचे जवान ज्ञानेश्वर जाधव,अंकुश सदाफळे  रुग्णवाहिकेसह घटनास्थळावर रवाना झाले. घटनास्थळी हजर असलेले बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार धुमाळ आणि पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने अपघातातील जखमीला 108 मधे आणि मृतकास पथकाच्या रुग्णवाहिकेने पुढील कारवाई करीता अकोला येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले.  


अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यु झाला आहे. मृतकांमधे कुमार विजय जाधव रा.मोझरी खु. (अंदाजे वय 25 वर्ष ) हा जागेवरच ठार झाला आहे तर दुसरे गोवर्धन राठोड महागाव लोहगाव (अं.वय 55 वर्ष) यांचा रुग्णालयात मृत्यू  झाल्याची माहीती आहे. कार चालक अश्विन ठाकरे (रा.जनुना)  हे  किरकोळ जखमी असल्याची माहीती आहे.

टिप्पण्या