patwari-caught-in-ACB-trap: शेतकऱ्याकडून दहा हजाराची लाच घेताना पटवारी अडकला ACB च्या सापळ्यात

संग्रहित चित्र




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील अकोट महसूल उपविभागातील तेल्हारा तहसीलमधील हिवरखेड भाग 2 मध्ये काम करणारा पटवारी त्याच्या वैयक्तिक सहकाऱ्यांसह अकोला एसीबीच्या सापळ्यात अडकला.


नोंदींमध्ये बदल करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली. तक्रारीनंतर अकोला एसीबीचे पोलिस उपअधीक्षक मिलिंद बाहकर आणि पथकाने सापळा रचून पटवारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली. तलाठी मंडळ कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती (हिवरखेड ता. तेल्हारा जि. अकोला) येथे ही घटना घडली.


प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील तकारदार यांनी 3 जुलै 2025 रोजी अन्टी करप्शन ब्युरो कार्यालय अकोला येथे तक्रार दिली की, त्यांच्या नावे असलेल्या मौजा हिवरखेड येथील प्लॉटची ऑनलाईन मध्ये नोंद करण्यासाठी ग्राम महसुल अधिकारी (तलाठी)  विनोद बापुराव आढे आणि त्याचा ऑपरेटर प्रमोद गुलाबराव इंगळे हे 15,000 रूपये लाच रकमेची मागणी करीत आहेत.


तक्रारदार यांच्या तकारीच्या अनुषंगाने  4 जुलै  रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कार्यवाही आजमाविली असता, आरोपी  विनोद आढे यांनी तडजोडी अंति दहा हजार रूपये लाच रकमेची मागणी केल्याचे तसेच आरोपी  प्रमोद इंगळे यांनी तक्रारदारला ग्राम महसुल अधिकारी विनोद आढे यांनी मागणी केलेल्या लाच रकमेस प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.



आज 23 जुलै  रोजी पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांनी आरोपी प्रमोद गुलाबराव इंगळे यांच्या मार्फतीने दहा हजार रूपये लाच रक्कम स्विकारल्याने दोन्ही आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन हिवरखेड (ता. तेल्हारा जि. अकोला) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.


सदरची कारवाई  मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र अमरावती,सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र अमरावती, मिलींदकुमार  बहाकर, पोलीस उप अधिक्षक, अन्टी करप्शन ब्युरो अकोला यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रविण वेरूळकर पोलीस निरीक्षक, श्री. अतुल इंगोले पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण पळसपगार, डिगांबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, प्रदिप गावंडे आणि चालक पो. अंम. नफीज शेख यांनी केली आहे.




टिप्पण्या