dr-abhay-patil-resigns-akola-: अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका; डॉक्टर अभय पाटील यांचा राजीनामा



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला (विदर्भ): अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.  2024 च्या लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी आपल्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्याचं ( फेसबुक ) समाज माध्यमावर पोस्ट केलं आहे.




अभय पाटील यांच्या स्वरूपात काँग्रेसला मिळालेल्या चेहऱ्यामुळे अनेक वर्षानंतर काँग्रेस पक्ष लोकसभेत दुसऱ्या क्रमांकावर होता.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभय पाटील हे जिल्ह्यातील कार्यकारणीवर नाराज असल्याचं समजते. 



अभय पाटील यांनी सध्या लेखी स्वरूपात आपला राजीनामा दिला नसला तरी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वर त्यांनी आपण राजीनामा दिल्याचं म्हंटलं आहे.

टिप्पण्या