ठळक मुद्दे
शिवसेना जिल्हा मेळावा, नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार
शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
अनेक पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नेत्या कार्यकर्त्यांचे इन कमिंग सुरू आहे. त्यामुळे शिवसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा.शासनाच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवा, गावागावात शाखा निर्माण करा, सदस्य नोंदणी वाढवा, असे आवाहन शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मा.आ. गोपीकिशन बाजोरीया यांनी केले.
स्थानिक जि.प. कर्मचारी भवन येथे शनिवारी आयोजित शिवसेना जिल्हा मेळावा तथा नवनियुक्त पदधिकार्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
मा.आ. बाजोरीया पुढे म्हणाले की, बाळासाहेबांचे गहाण ठेवलेले विचार शिंदे साहेबांनी बाहेर काढले. मुख्यमंत्री असताना योजनांचा धडाका लावला. महिला वर्गासाठी लाडकी बहिण योजना आणली. आजच्या कार्यक्रमाला महिला वर्गाची असलेली प्रचंड उपस्थिती ही शिंदे साहेबांचीच किमया आहे. म्हणूनच शिवसेने इतकी इनकमिंग आज इतर कोणत्याही पक्षात नाही. आपल्याला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांनी ठरवून दिलेल्या विचार धारेवर चालायचे आहे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांची सेवा करायची आहे. एकापेक्षा जास्त जिल्हाप्रमुख असल्याने जनतेची कामे झटपट होतील. माजी आ. नारायण गव्हाणकर आणि माजी जि.प. सभापती पांडे गुरूजी यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यात शिवसेनेला आणखी उभारी मिळेल. त्यामुळे शिवसैनिकांची आता तत्काळ कामाला लागावे. कोणतेही मतभेद न ठेवता सदस्य नोंदणीत पुढाकार द्यावा. जो चांगले काम करेल त्याचाच उमेदवारीसाठी विचार होईल. असे सांगून गोपीकिशन बाजोरीया यांनी जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करणार्या युवती सेना प्रमुख खुशी भटकर हिचा सत्कार केला. शिवाय गावागावात शिवसेना पोहोचवून आगामी निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.
यावेळी युवा नेते आ. विप्लव बाजोरीया, नवनियुक्त जिल्हा प्रमुख नारायण गव्हाणकर, नवनियुक्त जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरूजी, जिल्हा प्रमुख उषाताई विर्क, निवासी उपजिल्हा प्रमुख संतोष अनासने, युवासेना विदर्भ संपर्क प्रमुख राहूल कराळे, युवासेना जिल्हा प्रमुख निखिल ठाकूर, युवासेना जिल्हा प्रमुख नितीन मानकर, युवती सेना प्रमुख खुशी भटकर, उपजिल्हा प्रमुख मनिष कराळे, उपजिल्हा प्रमुख उमेशआप्पा भुसारी, अकोट विधानसभा उपप्रमुख संजय अढाउ, मुर्तिजापूर उपजिल्हा प्रमुख अप्पु तिडके, उपजिल्हा प्रमुख डॉ. गणेश बोबडे, रेखा राउत, तालुका प्रमुख कल्पना राठोड, अकोट तालुका प्रमुख प्रकाश गिते, तेल्हारा तालुका प्रमुख प्रविण वैष्णव, मंगेश म्हैसने, डॉ. डोंगरे, सुनील बैस, संगीता इंगळे आदींसह बहूसंख्य पदधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी संपर्कनेते गोपीकिशन बाजोरीया, आ. विप्लव बाजोरीया व नवनियुक्त पदाधिकार्यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
अनेकांची मक्तेदारी संपवू- गव्हाणकर
ज्यांच्या संपूर्ण परिवाराची हयात एकाच पक्षात गेली त्यांनीही पक्ष बदलले. पक्ष बदलाला मी एकटाच अपवाद नाही. त्यामुळे कोण काय बोलतो याकडे मी फारसे लक्ष देत नाही. असे सांगून नवनियुक्त जिल्हा प्रमुख मा.आ. नारायण गव्हाणकर यांनी आपल्याला अनेकांची राजकारणातील मक्तेदारी मोडायची आहे. जनसामान्यांना सत्येची दारे खुली करून द्यायची आहेत. आणि त्यासाठीच हा सोहळा असल्याचेही गव्हाणकर म्हणाले. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी विकासकामांचा धडाका लावला. महाराष्ट्राला प्रगती पथावर आणले. त्यांच्या या कार्याला भारावून आपण विधानसभा निवडणुकीच्या ६ महिन्यापूर्वीपासूनच त्यांच्या संपर्कात होतो. अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा मेळावा ही पूर्वतयारी- पांडे गुरूजी
स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी जिल्हाभरात पक्ष संघटन बांधणी,बुथ प्रमुख, सर्कल प्रमुख, शाखा प्रमुखांसह पदाधिकार्यांच्या नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून शिवसेनेचा जिल्हा मेळावा आयोजित केल्याचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख तथा माजी जि.प. सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सांगितले.
पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
अप्पू तिडके- मुर्तिजापूर उपजिल्हा प्रमुख
संतोष कासिदे-अनुजाती मोर्चा अकोला उपशहर प्रमुख
चंचल मेवाळे-मुर्तिजापूर विधानसभा संघटक
रुपेश कडू- मुर्तिजापूर तालुका प्रमुख
चेतन कांबे- युवासेना तालुका प्रमुख मुर्तिजापूर
अक्षय लबडे-युवासेना उपजिल्हा प्रमुख मुर्तिजापूर
गोपाल नागापुरे- जिल्हा प्रमुख इमाव सेल
संजय अढाउ -अकोट विधानसभा उपप्रमुख
कल्पना राठोड- बार्शिटाकळी ता.प्र. महिला
डॉ. संजय बोबडे-बार्शिटाकळी तालुका
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा