ठळक मुद्दे
*काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन भरगड यांचा राष्ट्रवादीत भव्य प्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीत.
*आमदार अमोल मिटकरी आणि मो. बद्रूजमा यांच्या नेतृत्त्वात शक्तिप्रदर्शन
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रमुख नेत्यांचा व कार्यकर्त्याचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा.
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 12 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते तथा माजी महापौर मदन भरगड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

हा भव्य सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विशेष पुढाकाराने आणि अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजम्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी अकोला जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक, पंचायती समिती सदस्य, तसेच युवक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मदन भरगड यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या प्रवेशामुळे अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होणार असून, मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जनसंपर्क अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा गुरुवार 12 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजता पोलिस लॉन्स, अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजमा यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा