political-akola-news-mla-clash: असा कुठलाही प्रकार सभागृहात घडला नाही…मग नेमके घडलय तरी काय? सभेतील राडा नंतर आमदारद्वय आणि पालकमंत्री यांची पहिली प्रतिक्रिया



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सत्ताधारी आणि विरोधक यांच्या मध्ये सुरू असलेले वाद आज नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या  खडाजंगी मुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले


.


अकोल्यात आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मध्ये पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर यांच्या समोर शाब्दिक वाद झाला. याचे पडसाद बाहेर उपास्थित दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पडले. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलीस धावले. मात्र सभागृहात कुठलाही शिवीगाळ अथवा अंगावर धावून जाणे प्रकार घडला नसल्याचे दोन्ही आमदार आणि पालकमंत्री यांनी म्हंटले आहे.




सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न



महानगर पालिकेच्या दलीत वस्तीच्या निधी वरून हा वाद झाला झाला असल्याचं शिवसेना (उबाठा) चे आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे तर सभागृहात विरोधकांचा आवाज सत्ताधारी दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप हे त्यांनी केला आहे मात्र अंगावर धावून जाणे किंवा शिवीगाळचा कोणताही प्रकार झाला नसल्याचा त्यांनी म्हंटलं आहे.



नितीन देशमुख यांनी वाद सुरू केला 


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. मुख्य म्हणजे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती.  त्यांच्यासमोर हा वाद उमटला होता. मात्र याची माहिती दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवना समोर एकच गर्दी केली आणि यावेळी एकमेकांच्या विरोधात जोरदार नारबाजी सुद्धा केली. पोलिसांनी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. 



मात्र या सभागृहात काही जण मोबाईल शूटिंग करत होते आणि त्यांना शूटिंग काढू नका, असे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटल्यानंतर नितीन देशमुख यांनी यावर आक्षेप घेत वाद सुरू केला असल्याचे भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी म्हंटलं आहे.




असा कोणताही प्रकार घडला नाही



तर या बैठकीत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे किंवा शिवीगाळ करणे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटले आहे.





टिप्पण्या