akola-hotel-fine-water-waste-: अकोला मनपाचा दणका! पाणी वाया घालवणाऱ्या हॉटेलवर पाच हजार रुपयांचा दंड

अकोल्यात पाणी वाया घालवणे पडले महागात! 

रामदासपेठेतील प्रसिद्ध हॉटेलवर मनपाने ठोठावला 5000 चा दंड.

तक्रार करण्यासाठी नंबर जाहीर 



अकोल्यात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर मनपाचा बडगा, प्रसिद्ध हॉटेलला ५ हजारांचा दंड



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  अकोला शहरात पाणीटंचाईचे सावट असताना पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांची आता खैर नाही. अकोला महानगरपालिकेने एका हॉटेल व्यावसायिकावर थेट ५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.


काय घडलं?

मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार शहरात झोन निहाय पथके तयार करण्यात आली आहेत. आज दि. २२ ऑक्टोबर रोजी पूर्व झोनच्या पथकाने तपासणी केली असता रामदास पेठ येथील रॉय रिट्रीट हॉटेल येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळून आले. पथकाने तात्काळ पंचनामा करून हॉटेल मालकावर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.


मनपाचे नागरिकांना आवाहन


अकोला महानगरपालिका क्षेत्रात भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी आणि बोअरवेलचे पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे.


पाणी वाया घालवताना दिसल्यास तक्रार करा - नाव गुप्त ठेवले जाईल


जर तुम्हाला शहरात कुठेही खालील प्रकार दिसले तर तात्काळ मनपाला कळवा:


१. पाईपलाईन फुटलेली आढळल्यास

२. बांधकामासाठी मनपाचे पाणी किंवा बोअरवेलचे पाणी वापरताना दिसल्यास

३. RO प्लांटवर महानगरपालिकेचे पाणी वापरताना दिसल्यास


तक्रार क्रमांक: ०७२४ / २४३४४१२


तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




टिप्पण्या