birth-death-registration-certific: प्रशासनाव्‍दारा रद्द केलेले जन्‍म-मृत्‍यू नोंदणीचे दाखले तातडीने जमा करावे; अन्‍यथा कारवाईचा बडगा!





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगरपालिका हद्दीतील नागरीकांनी शासनाच्‍या प्राप्‍त आदेशाचे गांभिर्य लक्षात घेऊन नायब तहसिलदार अकोला यांचे आदेशाव्‍दारे अकोला महानगरपालिका येथून 1 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये प्राप्त केलेले जन्म मृत्युचे दाखले त्‍वरीत अकोला महानगरपालिकेच्‍या जन्‍म - मृत्‍यु  विभाग येथे जमा करावे. या कालावधीत प्राप्‍त करण्‍यात आलेले जन्‍म/मृत्‍यु चे दाखले कोणत्‍याही कामानिमित्‍त वापरत असल्‍याचे आडळून आल्‍यावर संबंधीतांवर नियमानुसार कारवाई करण्‍यात येणार आहे.  

नागरिकांनी 1 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2025 या कालावधीतील नायब तहसीलदार यांच्‍या आदेशांव्‍दारे घेतलेले जन्‍म आणि मृत्‍युचे दाखले तातडीने मनपाच्‍या जन्‍म मृत्‍यु विभाग येथे जमा करण्‍याचे आवाहन निबंधक, मनपा अकोला यांनी केले आहे.  


ज्‍या नागरिकांचे उशिरा जन्म मृत्यू नोंदणीचे आदेश रद्द झालेले आहेत व त्‍यांना आदेश प्राप्‍त करून घ्‍यायचे असल्‍यास त्‍यांनी तहसील कार्यालय अकोला यांचे आदेशानुसार करण्याकरीता सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र.जमनों 2525/(ई.ऑ.991181)/प्र.क्र.22/कु.क.नवीन मंत्रालय, लो. टि. मार्ग, मुंबई-400001 दि.12 मार्च 2025 मध्ये नमुद  दस्तावेज दाखल करुन जन्म/मृत्‍यू नोंदणी आदेश प्राप्त करुन घ्यावे, असे अकोला महानगर पालिका प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.



टिप्पण्या