ठळक मुद्दे
*जिल्ह्यातील विकासकामांबाबत आढावा बैठक
*कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज गुरूवार 12 जून रोजी अकोला व वाशिम जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात होणार आहे.
असा आहे दौरा
अजित पवार यांचे सकाळी ९.३५ वा. शिवणी विमानतळ, अकोला येथे आगमन होईल. यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे ९. ४५ वा. आगमन,
सकाळी १० वा. अकोला व वाशिम जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक.
दुपारी १२ वा. पत्रकार परिषद, नंतर मोटारीने पक्ष कार्यालयाकडे प्रयाण,
दुपारी १२.३० वा. महानगर कार्यालय, न्यू क्लॉथ मार्केटसमोर, अकोला येथे राखीव,
दुपारी १२.५५ वा. शिवसंभव, कौलखेड रस्ता, नवे आरोग्यनगर, हिंगणा फाटा, अकोला येथे आगमन,
दुपारी १२.५५ ते १.४५ राखीव,
दुपारी १.४५ ते नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटी, नंतर पोलीस लॉन्सकडे रवाना,
दुपारी २.३० वा. पोलीस लॉन्स येथे आगमन व कार्यकर्ता मेळावा,
अकोला शहरातील सर्व कार्यक्रम आटोपून अजित पवार हे दुपारी ४ वा. खामगावकडे प्रयाण करतील.
अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा