sajid-pathan-took-a-new-step: आमदार साजीद खान पठाण यांनी रुजविला नवा पायंडा; विद्यार्थ्यांसाठी जन्मदिनी मागितले शालेय साहित्याचे दान



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे.त्यांनी आपला जन्मदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. हारतुरे न स्वीकारता भेटवस्तू म्हणून पुस्तकं आणि शालेय साहित्य स्वीकारली. पहलगाम येथे झालेल्या घटनेमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. समाजातील गरजूंना मदतीचा हात देत स्वीकारलेल्या सर्व भेटवस्तू गरजू विद्यार्थ्यांना देण्या येणार आहे. त्यांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहक ठरणार आहे. साजिद खान पठाण यांनी आपल्या जन्मदिवशी रुजविलेला हा नवा पायंडा निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.



वाढदिवस साजरा न करता समाजसेवेचा अनोखा उपक्रम 


अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांचा वाढदिवस 2 मे रोजी साजरा झाला. मात्र ना केक कापला ना कुणाकडून हारतुरे स्वीकारली. दिवसभर मात्र चाहत्यांचा शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती. सध्याच्या सामाजिक, आर्थिक व राष्ट्रीय परिस्थितीचा विचार करून त्यांनी आपला वाढदिवस उत्सव न साजरा करता, तो सामाजिक भान ठेवून जनतेच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला होता.


देशात नुकतेच झालेले काश्मीरमधील भ्याड हल्ले, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, महागाईमुळे सामान्य जनतेचे हाल, तसेच अन्यायकारक कायद्यामुळे पीडित समाज घटकांवर होणारा अन्याय पाहता, आमदार पठाण यांनी वाढदिवसाच्या दिवशी कोणताही उत्सव न करता तो साधेपणाने साजरा केला.


विशेषतः केंद्र सरकारने वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्तीमुळे मुस्लिम समाजात अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या दुरुस्तीच्या माध्यमातून वक्फ मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्याचा एकतर्फी प्रयत्न करण्यात आला असून, अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या धार्मिक व सामाजिक स्थळांवर अन्यायकारक हस्तक्षेप सुरू आहे. या प्रकारामुळे संविधानिक हक्क आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांवर गदा येत आहे, असे आमदार पठाण यांनी स्पष्ट केले आहे.


शुक्रवार 2 मे रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत सर्किट हाऊस, अकोला येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. सामान्य जनतेच्या समस्या ऐकल्या.  पठाण यांनी आधीच सर्व समर्थक, कार्यकर्ते, व नागरिकांना केलेल्या भावनिक आवाहन नुसार, शुभेच्छा देणाऱ्यांनी कोणीही त्यांना हार, फुले, गुलदस्ते, शाल किंवा भेटवस्तू दिल्या नाहीत.  शालेय साहित्य, वह्या, पेन, नोटबुक्स, शालेय बॅग इत्यादी दिल्या.  पठाण यांच्या वाढदिवसा निम्मित आलेले हे शालेय साहित्यांचे दान गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोगी पडणार आहे. शिवाय वाढदिवस कार्यक्रमाचा वाचलेला पैसा मधून आणखी शालेय साहित्य खरेदी करून ते विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना देणार आहे.या उपक्रमातून त्यांनी समाजात सामाजिक जाणीव जागृत करत, लोकप्रतिनिधी कसा जबाबदारीने वागू शकतो याचा आदर्श निर्माण केला आहे. अकोला शहरात त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.





"माझ्या वाढदिवसाला जर आपण एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकलो, तर तोच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल" 

आ. साजिद खान पठाण 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ 



 


मतदारसंघात ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन 


आ. साजिद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी विविध महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.  हमजा प्लॉट, डाबकी रोड येथे  महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.




टिप्पण्या