Increase-thefts-bullion-shops: बंटी बबली आणि आजीने हात चलाखीने लुटला सोन्याचा ऐवज; अकोल्यात सराफा दुकानातील चोरीच्या घटनेत वाढ

cctv footage image


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोल्यात सराफा दुकानातून नजर चुकवून चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. बंटी - बबली आणि आजी अशी ही तिकडी हात चालखीने चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही बध्द झाले आहेत. परंतू अजून त्यांचा पोलिसांना सुगावा लागला नाही.



शहरातील गांधी रोडवरील खंडेलवाल आभूषण या सराफा दुकानातून सोन्याचे दागिने एका उच्चशिक्षित आणि सदन घराच्या दिसणाऱ्या बंटी - बबली आणि आजीने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. 5 मे रोजी दुपारी या तिन्ही चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील कर्मचारी महिलेला आभूषणे दाखविण्यास सांगितले. यातील पुरुष आरोपीने कर्मचारी महिलेचे लक्ष आपल्याकडे वळविले आणि महीलेनी हात चलाखीने वृद्ध महिलेच्या हातात हे दागिने दिले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 





दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार या महिलेने दीड वर्षांपूर्वी सुद्धा आपल्या दुकानात चोरी केली होती. मात्र तिचा थांग पत्ता आतापर्यंत लागलेला नाही, तर आता परत या महिलेने दुकानात चोरी केली आहे. या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या टोळीचा पोलिसांना अद्यापही कोणताही सुगावा लागलेला नाही.



मलबार गोल्ड अँड डायमंड शोरूम मधून काल एका 22 वर्षीय युवतीने सोन साखळ्या लंपास केल्या होत्या. या युवतीचा शोध अकोला पोलीसांनी अवघ्या सहा तासात लावला. मात्र बंटी बबली आणि आजी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.



टिप्पण्या