cheque-bounce-case-court-akl: धनादेश अनादर प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता; ॲड. झटाले व ॲड. गव्हाळे यांचा प्रभावी युक्तिवाद
फिर्यादीकडून व्यवहार सिद्ध न झाल्याने न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला | नीलिमा शिंगणे जगड
अकोला येथील विद्यमान दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधीश श्री. डी. एस. कोलते यांच्या न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात आरोपी सुभाष भिवसन बागडे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी विवेक रामगोपाल अग्रवाल यांनी दाखल केलेल्या एस.एस.सी. क्र. १८०४/२०२२ या प्रकरणात न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला.
फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने वैयक्तिक गरजेसाठी त्यांच्याकडून १ लाख रुपयांची हातउसनी रक्कम घेतली होती. ही रक्कम परत करण्यासाठी आरोपीने धनादेश क्रमांक १९७८३६ दिला होता. मात्र, संबंधित धनादेश बँकेत अनादरित झाल्यानंतर फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी यांनी स्वतः साक्ष दिली. तसेच आरोपीनेही स्वतः न्यायालयात साक्ष नोंदवली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल देताना फिर्यादींकडून व्यवहार कायदेशीररीत्या सिद्ध करण्यात अपयश आल्याचे नमूद केले.
आरोपीच्या वतीने बाजू मांडताना ॲड. व्ही. पी. झटाले (ॲड. विजय झटाले पाटील ) आणि ॲड. शेषराव महादेवराव गव्हाळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, संबंधित धनादेश हा आरोपीने एलआयसीच्या थकीत हप्त्याच्या परतफेडीसाठी फिर्यादीची पत्नी रचना विवेक अग्रवाल यांना केवळ सही करून दिला होता. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात कोणताही थेट आर्थिक व्यवहार झाला नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
तसेच फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीने संगनमत करून खोटे प्रकरण दाखल केल्याचा मुद्दाही बचाव पक्षाने उपस्थित केला. व्यवहार पारदर्शक नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
ठळक मुद्दे
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता
एस.एस.सी. क्र. १८०४/२०२२ मध्ये न्यायालयाचा निकाल
फिर्यादीकडून व्यवहार सिद्ध करण्यात अपयश
एलआयसी हप्त्याच्या संदर्भात धनादेश दिल्याचा बचाव पक्षाचा दावा
ॲड. व्ही. पी. झटाले व ॲड. शेषराव गव्हाळे यांचा प्रभावी युक्तिवाद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा