ठळक मुद्दा
वर्धा न्यायालयाचे आदेशाने सोनसाखळी चोर अकोला पोलिसांच्या ताब्यात
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मलकापुर, गौरक्षण रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावुन चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या.
एप्रिलच्या सुरवातीला पोलीस स्टेशन खदान हद्दीत घडलेले लागोपाठ दोन दिवस मंगळसूत्र हिसकावून लंपास करण्याचे प्रकार घडले होते. हे दोन्ही चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड झाले असून, वर्धा न्यायालयाचे आदेशाने दोन सोनसाखळी चोर अकोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, ०८/०४/२०२५ रोजी रचना नगर, गौरक्षण रोड व दिनांक ०९/०४/२०२५ रोजी मलकापुर, गौरक्षण रोड या परिसरात लागोपाठ ०२ दिवस महिलांचे गळयातील सोनसखळी हिसकावुन चोरी च्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या चोरांना पकडणे पोलीसांसमोर आव्हान होते.
पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे आदेशाने पो.स्टे. खदान व स्था.गु.शा. येथील दोन पथक गुन्हयाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत होते.
स्था.गु.शा. पथकाने सि.सि.टी.व्ही. फुटेजची पाहणी व प्रत्यक्षदर्शी यांची विचारपुस करून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी रेल्वे स्थानक परिसरात लॉज वर खोटे आधार कार्डचा वापर करून घटनेपुर्वी मुक्काम केल्याचे दिसुन आले. तसेच हॉटेल मधील फुटेज वरून तसेच आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटर सायकल कोणत्या वाहनतळामध्ये ठेवली ते निष्पन्न केले.
परंतु आरोपी खोटे आधार कार्ड, खोटा मोबाईल नंबर व दुचाकीला खोटा नंबर वापरल्याने तपसात अडचण निर्माण झाली होती.
या दरम्यान पुढील दोन दिवसात पो.स्टे. रामनगर, वर्धा हद्दीत अशा वर्णनाप्रमाणे चैन स्नॅचिंग झाल्याची माहिती मिळाल्याने स्था.गु.शा. प्रमुख पो.नि. शंकर शेळके यांनी व पथकाने वर्धा येथील पथकाशी संपर्क करून घटनेची माहिती घेतली. घटना सारखीच असल्याची खात्री पटल्याने स्था.गु.शा. अकोला पथक यांनी वर्धा येथील बस स्थानक परिसरात लॉजेस चेक केले असता, अकोला प्रमाणे आरोपी खोटे आधार, नाव, मोबाईल खोटे देवुन वर्धा येथे मुक्काम केला होता. सदर माहिती स्वतः पो.नि. स्था.गु.शा. अकोला यांनी वर्धा येथील स्था. गु.शा. यांचेशी शेअर करून तसेच अकोला व वर्धा येथील घटनेचा अनुषंगाने तांत्रीक माहितीचे विश्लेषण करून आरोपीची ओळख पटविण्यात आली.
आरोपी वैभव नारायण अडोळे (वय २५ वर्ष ), रोहण मोहनराव हुनंकर (वय २२ वर्ष दोन्ही रा. येरला ता. मोर्शी जि. अमरावती) यांना २९/०४/२०२५ रोजी वर्धा न्यायालयाचे आदेशाने ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपीतांनी अकोला येथील पो.स्टे. खदान येथील अप क. ३१४/२०२५ कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या. सं. आणि अप क. ३१८/२०२५ कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.स. च्या गुन्हयाची कबुली दिली. आरोपींकडून दोन्ही गुन्हयातील एकुण मुद्देमाल सोने २१ ग्रॅम कि.अं. १,८०,०००/ रु. चा जप्त करण्यात आला आहे.
या गुन्हयातील आरोपी वैभव नारायण अडोळे, (वय २५ वर्ष रा. येरला ता. मोर्शी जि. अमरावती) याचेवर घरफोडी, चोरी, चैन स्नॅचिंग असे गंभीर स्वरूपाचे २५ पेक्षा जास्त गुन्हे अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, वर्धा, नागपुर, जालना येथे दाखल आहेत.
पोलीस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतिश कुलकर्णी व स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी पो. नि शंकर शेळके, पो.नि. मनोज केदारे पो.स्टे. खदान अकोला, स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण LCB अकोला, स्था.गु.शा. चे पोलीस अंमलदार अब्दुल माजीद, वसिम शेख, सुलतान पठाण, रवि खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, अमोल दिपके, अशोक सोनवणे, राहुल गायकवाड व सायबर सेलचे अंमलदार गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी ही कारवाई केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा