भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने शुक्रवार 2 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयवर धडक टॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारों शेतकऱ्यांचा सहभाग होता.
महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेस आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र या घोषणा फक्त कागदोपत्रीच राहिल्या आहेत. आज राज्यामध्ये पूर्ण बहुमताने महायुती सरकार येऊन जवळपास 6 महिने होऊन गेले. तरी देखील अद्यापही घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णतः फसवणूक केली आहे. त्याकरिता शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर टॅक्टर मोर्चा धडकला.
अकोला क्रिकेट क्लब मैदान येथून मोर्चा प्रारंभ होवून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत गेला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
माजी आ.गजानन दाळू गुरुजी, मा.आ.संजय गावंडे, मा.आ. हरिदास भदे, जिल्हाप्रमुख मंगेश काळे,जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रा.माया म्हैसने, सरिता वाकोडे, दिलीप बोचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख,श्याम गावंडे जिल्हा समन्वयक, अजय पाटील गावंडे तालुकाप्रमुख तेल्हारा, ब्रम्हा पांडे तालुकाप्रमुख अकोट, विक्रम जायले विधानसभा संघटक, मनोज खंडारे शहरप्रमुख अकोट, अमोल पालेकर शहरप्रमुख अकोट, विवेक खारोडे शहरप्रमुख तेल्हारा, शंकरराव ताथोड विधानसभा सहसंघटक, सुभाष सुरत्ने आदिवासी तालुका प्रमुख, गजानन मोरखडे विधानसभा सहसमन्वयक, गोपाल विखे शेतकरी सेना उपजिल्हा प्रमुख, ज्ञानेश्वर ढोले शेतकरीसेना तालुकाप्रमुख,अकोट, बाळासाहेब निमकर्डे शेतकरीसेना तालुकाप्रमुख, तेल्हारा आदींनी मोर्चा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
फलकांनी वेधले लक्ष
उद्योगपतीवर प्रेम करणारे सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतील का? शेतकरी टिकेल तरच शेत पिकेल, इडा पीडा टळू दे, शेतकऱ्यांचे राज्य येऊ दे, शेतक-यांचा सातबारा कोरा करा अशा लक्षवेधी मागण्यांसह विविध फलकांनी लक्ष वेधले होते.
गावागावातून शेतकरी अकोल्यात
गावागावातून टॅक्टर चालक, शेतकरी, शिवसैनिक पहाटेच गावातून निघून सकाळी 10 वाजेपर्यंत मोठया संख्येने अकोला शहरात पोहाचले होते.
बच्चू कडू यांची विशेष उपस्थिती
प्रहार पक्षाचे अध्यक्ष , शेतकरी नेते तथा
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची मोर्चात विशेष उपस्थिती होती.
500 ट्रॅक्टर आणि 10,000 शेतकरी
45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये उन्हाच्या झळा सोसत 500 ट्रॅक्टर सह 10,000 शेतकरी मोर्चात सामील झाले होते. शेतकरी महिला- पुरुष, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील भगिनी व त्यांची मुले भगवे फेटे बांधून मोर्चामध्ये सहभाग झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा