भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड 
अकोला: रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तार फैल परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अकोला शहर पुरते हादरले आहे. क्षुल्लक घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची आणि तीन वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार सूरज गणवीर उर्फ गोट्या असं आरोपीचे नाव असून, त्याने तीन वर्षांची मुलगी आयेशा गणवीर आणि पत्नी अश्विनी गणवीर (25) यांचा गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे . 
घरगुती वादातून हा हत्येचा गंभीर प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. अद्याप हत्येमागील कारण समोर आलेले नाही. मात्र आरोपी सूरज याची मृतक अश्विनी ही दुसरी पत्नी होती. त्यांच्यात रोजचे घरगुती वाद चालत होते, अशी परिसरात कुजबुज होती.
दरम्यान, एसडीपीओ सतीश कुलकर्णी, एसएचओ अरुण परदेशी आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
 
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा