accident-on-new-flyover-akola: नवीन उड्डाणपुलावर अपघात; युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

 


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर टॉवर जवळ एका दुचाकीच्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संतोष वनवासे असं या मृत युवकाच नाव असल्याचे कळते. 


प्राप्त प्राथमिक माहितीनूसार, 25 वर्षीय संतोष वनवासे हा मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, सिंधी कॅम्प परिसरात राहून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करीत होता. 


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गाडी चालकाची दुचाकी अचानक घसरली आणि पुलाच्या कडेला असलेल्या भिंतीवर जोरदार आदळली. भिंतीला जोरदार धडक दिल्याने त्याच्या काना नाकातून रक्तप्रवाह सुरू झाला. यातच चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील प्रक्रिया पार पाडली.






(सूचना: या अपघाताचे फोटो Bhartiya Alankar news 24 जवळ उपलब्ध आहेत. मात्र हृदय हेलावून टाकणारी ही दृश्य असल्यामुळे आम्ही येथे अपघाताची छायाचित्र प्रकाशित करू शकत नाही. भारतीय अलंकार न्यूज 24 चा वाचक हा सर्व वयोगटातील आहे.)

टिप्पण्या