- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेकरीता मुख्य जलस्त्रोत काटेपुर्णा प्रकल्प (महान) असून आज 15 एप्रिल 2025 रोजी प्रकल्पामध्ये 22.83 द.ल.घ.मी. एवढा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे अकोला शहराला 3 दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा 16 एप्रिल 2025 पासून पाणी पुरवठा 4 दिवसआड म्हणजे 5 वे दिवशी करण्यात येत आहे.
अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेकरीता मुख्य जलस्त्रोत काटेपुर्णा प्रकल्प (महान) असून आज 15 एप्रिल 2025 रोजी प्रकल्पामध्ये 22.83 द.ल.घ.मी. एवढा साठा उपलब्ध आहे.
सद्यस्थितीत तापमानात सातत्याने वाढ होत असून, शहरामध्ये तीव्र उन्हाळा जाणवत आहे. तसेच वाढते तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. परंतु दिवसेंदिवस धरणातील पाणी साठ्यामध्ये लाक्षणिक स्वरुपात घट होत आहे. त्यामुळे 3 दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा 16 एप्रिल 2025 पासून सुरु असलेला पाणी पुरवठा 4 दिवसआड म्हणजे 5 वे दिवशी करण्यात येत आहे.
यामुळे 65 MLD प्लांटवरील महाजनी जलकुंभ, मोठी उमरी जलकुंभ, गुडधी जलकुंभ, नेहरु पार्क जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशव नगर जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगा नगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ वरून होणारा पाणी पुरवठा 4 दिवसाआड 5 वे दिवशी करण्यात येईल यांची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी आणि मनपा प्रशासनास सहकार्य करावे. तसेच अकोला शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी साठवणुक करुन पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा