temperatures-poultry-farming: वाढत्या तापमानाचा कुक्कुटपालनावर परिणाम; पक्षी बचावासाठी युवा शेतकऱ्यानी लढविली अनोखी शक्कल




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : राज्यात सध्या उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम मानवांसोबतच पक्षी आणि प्राण्यांवर देखील जाणवत आहे. अशातच अकोला जिल्ह्याचा पारा 44 अंशांवर पोहोचला आहे. याचा फटका कुक्कुट पालन उद्योगाला बसत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील कोंबडी पालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील पातूर येथील युवा शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवत, या कोंबड्यांचे तीव्र तापमानात देखील उत्तम संगोपन करीत आहे.



कुक्कुटपालन उद्योगाचा महत्त्वाचा नियम म्हणजे कोंबड्यांसाठी चांगले निवारा असणे आवश्यक आहे. हा निवारा सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी असला पाहिजे. निवाऱ्यातील तापमान आणि हवेचे योग्य व्यवस्थापन असावे, असा आहे. मात्र यंदाचा उन्हाळा प्रचंड त्रासदायक ठरत आहे.


वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. 


कोंबड्या उष्णतेमध्ये त्रास अनुभवतात. यामुळे त्यांच्या अन्न सेवनात कमी आणि परिणामी वजन कमी होऊ शकते, ज्यामुळे अंडी उत्पादकतेवर नकारात्मक प्रभाव पडतो तर अधिक तापमानामुळे कोंबड्यांचा मृत्यू सुद्धा होतो. ही शक्यता आणि परिणाम लक्षात घेत,  या पक्षांच्या बचावासाठी पातुर येथील सैय्यद रियाज या शेतकऱ्याने अनोखा उपाय शोधून काढला आहे.सैय्यद रियाज आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये 8 हजार कोंबड्यांचा संगोपन करत आहेत.



उन्हापासून कोंबड्यांचा बचाव करिता रियाज यांनी आपल्या पोल्ट्री फार्मवर वॉटर स्प्रिंकल तर पोल्ट्री फार्मच्या आत कोंबड्यांसाठी 6 कुलर लावले आहेत. त्याच बरोबर बाहेरील गरम हवा आत न यावी याकरिता त्यांनी पोल्ट्री फार्मच्या बाहेर पोते सुद्धा लावली आहेत.



स्प्रिंकलर द्वारा पोत्यांवर पाणी पडून थंड हवा आत जाते. यामुळे बाहेरील गरम हवा रोखण्यास मदत होत आहे. तर टीन पत्रावर पांढरा रंग लावला आहे. अश्या प्रकारे उन्हापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी रियाज यांनी प्रयत्न केला आहे. याचा परिणाम उत्पादनावर देखील चांगला होत असल्याचे सैय्यद रियाज यांनी सांगितले. 

टिप्पण्या