ठळक मुद्दा
बस स्थानक परिसरात सोन्याचे दागिने चोरी करणारी सराईत गुन्हेगार महिला पोलीस स्टेशन सिव्हील लाईनचे जाळ्यात अडकली आहे
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सध्या अक्षय तृतीया सणानिमित्त सराफा बाजार तेजीत आहे. इतर जिल्हयातील तसेच अकोला ग्रामीण भागातील महिला सोने खरेदी विक्रीस अकोला शहरात येतात. तर काही नातेवाइकांच्या भेटीस गावी येतात. याच संधीचा फायदा काही सराईत गुन्हेगार घेताना दिसतात. अकोला मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून सोन्याचे दागिने चोरी होण्याचे प्रमाण अलीकडे जास्त झाल्याचे निदर्शनात आले होते. त्यामुळे या भागावर पोलिसांनी करडी नजर ठेवल्याने या गुन्हेगारांचे यावेळी फावले नाही. सोमवारी अकोला बस स्थानक परिसरातून एका महिलेची गळ्यातील पोत चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. मात्र काही तासाच्या आतच अकोला सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे विशेष पथकाने मोठ्या शिताफीने या चोरास जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे हा चोर महिला असून त्यातही सराईत गुन्हेगार. बस स्थानक परिसरातून याआधीही तिने अनेकदा सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबूली दिली आहे. यापैकी दहा गुन्ह्यातील एकूण ८० ग्रॅम २९० मिली सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ३,०९,१३८/- रुपयाचा मुद्देमाल सिव्हील लाईनचे पोलीसांनी आरोपी महिलेकडून हस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक २७/०४/२०२५ रोजी पो. स्टे. सिविल लाईन, अकोला येथे फिर्यादी ग.भा. पंचफुला गुलाबराव माळवे (रा. सुकळी उबार ता. आर्वी जिल्हा-वर्धा) या तिच्या दोन मुली रेखा आणि सुशीला (ग्राम-विवरा ता. पातुर जिल्हा-अकोला) याचे भेटी करिता दिनांक २७/०४/२०२५ रोजी सकाळी ०४/०० हिंगणघाट ते अकोला जाणाऱ्या बस मध्ये बसून दुपारी ०२/०० वाजताचे सुमारास अकोला येथील नवीन बस स्थानक येथे पोहचल्या. तेथून ग्राम-विवरा येथे जाणे करिता दुपारी ०२/३० वाजता सुमारास अकोला येथील नवीन बस स्थानक येथून अकोला ते पातुर बस मध्ये चढत असतांना त्यांचे गळ्यात ओढल्या सारखे वाटले. तेव्हा त्यांनी गळ्यातील सोन्याचे पोतीकडे हात लावून बघितला असता त्यांना त्याची सोन्याची पोत दिसली नाही म्हणून आरडा ओरड केली परंतु ती कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने त्याचे गळ्यातील सोन्याची पोत वजन अंदाजे ३.५ ग्रॅम वंजनाची किंमत अंदाजे ३०,०००/- रुपये असून ती कोण्यातरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने त्यांनी अज्ञात चोरा विरुद्ध तक्रार नोंदविली. दिलेल्या तक्रार वरून पोलीस स्टेशनला अपराध क्रंमांक १४३/२०२५ कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल करून तपासात घेतला.
पो.स्टे. सिव्हील लाईन हद्दीत नवीन बस स्थानक अकोला येथे सतत चोरीचे गुन्हे होत असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरिक्षक जयवंत रघुनाथ सातव यांनी गुन्हा उघडकीस आणणे करिता पो.स्टे. अंतर्गत विशेष पथक नेमून व त्यांना गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे संबधी सूचना देवून त्वरित शोध घेण्याचे सांगितले. पथकाने घटनास्थळी भेट देवून तसेच फिर्यादीची व स्थानिकांची विचारपूस करून तेथे गुप्त बातमीदार नेमण्यात आले. तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या.
दरम्यान, गुप्त बातमीदार यांचे मार्फत गुप्त माहिती मिळाली की एक संशयित महिला टॉवर चौक जवळ परिसरातून गाडी मध्ये बसून निघून जाणार आहे. अश्या मिळालेल्या माहिती वरून विशेष पथकातील पोलीस कर्मचारी यांनी विलंब न करता सदर ठिकाणी पोहचून शोध घेतला. तिथे मिळालेल्या माहिती प्रमाणे एक महिला (वय अंदाजे २५ ते २६ वर्षे वयोगटातील) संशयास्पद हालचाल करतांना दिसली. तिच्या हालचाली वरून तिचा संशय आल्याने विशेष पथकासह तिचे जवळ जावून तिला परिचय दिला. त्यानंतर दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता तिने नुकताच सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. यावरून तिला तिचे नाव गाव व पत्ता विचारले असता तिने तिचे नाव कीर्ती रोहित गायकवाड (पहिला पती) उर्फ कीर्ती सागर वानखडे (दुसरा पती) (रा. पिवंदळ खुर्द ता. तेल्हारा जिल्हा-अकोला) असे सांगितले. या गुन्ह्यात आरोपी निष्पन्न झाल्याने अटक करण्यात आली. तिला सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन अंतर्गत यापूर्वी चोरी झालेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण व विश्वासात घेवून विचारपूस केली असता, तिने यापूर्वी देखील चोरी केल्याची कबुली दिली आहे. एकूण दहा गुन्हे या सराईत महिलेने कबूल केले आहेत.
या गुन्ह्याची दिली कबूली
१४१/२०२४
४ ग्रॅम सोन्याचे लगड किंमत अंदाजे ८,०००/- रुपये
३४६/२०२४
४ ग्रॅम सोन्याचे लगड किंमत अंदाजे ७,६५०/- रुपये
३९१/२०२४
७ ग्रॅम सोन्याचे लगड किंमत अंदाजे १९,०००/- रुपये
४१०/२०२४
२५ ग्रॅम सोन्याचे लगड किंमत अंदाजे १,०८,०००/- रुपये
४३१/२०२४
६.०५० ग्रॅम सोन्याचे लगड किंमत अंदाजे ८,१०१/- रुपये
५२६/२०२४
२ ग्रॅम ४० मिली सोन्याचे लगड किंमत अंदाजे १०,३८७/- रुपये
५६०/२०२४
१८ ग्रॅम सोन्याचे लगड किंमत अंदाजे ७०,०००/- रुपये
५९०/२०२४
५ ग्रॅम ७०० मिली सोन्याचे लगड किंमत अंदाजे ३०,०००/- रुपये
९९/२०२५
५ ग्रॅम सोन्याचे लगड किंमत अंदाजे १८,०००/- रुपये
१४३/२०२५
३.५ ग्रॅम सोन्याचे मनीची पोत किंमत अंदाजे ३०,०००/- रुपये
अश्याप्रकारे एकूण १० गुन्ह्यातील एकूण ८० ग्रॅम २९० मिली सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ३,०९,१३८/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाईही कामगिरी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग सतीष कुलकर्णी यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक जयवंत सातव, पो.स्टे. सिव्हील लाईन, अकोला श्रेणी पोलीस उप निरीक्षक दिनेश पवार व विशेष पथकातील पो.हे.कॉ. सुरेश नारायणराव लांडे, किशोर काशिनाथ सोनोने, पो.हे.कॉ. विजय नामदेव भटकर तसेच भूषण जनार्दन मोरे ,प्रशांत विजय शिरसाट , अक्षय तायडे , उमेश यादव , मंगेश चुन्नीवाले , जयश्री अबगड , दिपाली नारनवरे , भाग्यश्री देशमुख व रामा धनसिंग पवार यांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा