- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
shiva-parvati-vivah-sohala-rail: रेल गावात उत्साहात पार पडला शिव पार्वती विवाह सोहळा;आदिवासी कोळी महादेव समाजाची परंपरा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
रेल गावात आदिवासी कोळी महादेव समाजाच्या पारंपरिक पद्धतीने भगवान महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न
Shiva Parvati marriage ceremony held in Rail village with enthusiasm; tradition of tribal Koli Mahadev community
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील रेल गावात आदिवासी कोळी महादेव समाजाच्या पारंपरिक पद्धतीने भगवान महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या लग्नात जेवणावळी, देवकुंडी, वरात, वाजंत्री, पाहुण्यांची लगबग असते.
वधू-वराकडील मान-सन्मान यांचा विधी केला जातो. मंगलाष्टके केली जातात. अनादी काळापासून हा लग्नसोहळा उत्साहात पार पडतो. असा हा आगळा वेगळा विवाह सोहळा आज शनिवार 5 एप्रिल रोजी पार पडला. हा लग्नसोहळा रेल येथील रेलेश्वर संस्थानच्या वतीने दरवर्षी चैत्र महिन्यातील नवमीला साजरा करण्यात येतो, अशी माहिती आयोजक तथा संस्था अध्यक्ष सुधाकर घुगरे यांनी दिली.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल गावात मोठ्या धूमधडाक्यात 5 एप्रिल रोजी शिव पार्वती विवाह सोहळा धूमधडाक्यात साजरा झाला. आदिवासी कोळी महादेव जमातीने अनेक वर्षापासूनची देवाच्या लग्नाची ही परंपरा जोपासली आहे. आगळ्या वेगळ्या देवाच्या या लग्न सोहळ्यासाठी शनिवारी सकाळपासूनच वर व वधू कडील पाहुणे मंडळीनी गावात हजेरी लावली होती. वाजंत्री, मंगलाष्टके सारं काही धार्मिक रिती रिवाजानुसार एखाद्या खऱ्या लग्नासारखे वातावरण याठिकाणी पाहायला मिळाले.
हा लग्नसोहळा साजरा करण्याची परंपरा रेल गावात हजारों वर्षापासून स्थानिक आदिवासी कोळी जमातीच्या लोकांनी जोपासली आहे. या लग्न सोहळ्याचा मान घुगरे आणि इंगळे परिवाराकडे असतो. इंगळे परिवाराची वधू माता श्रीपार्वती, तर घुगरे कुटुंबीयांकडे वर भगवान महादेव यांचा मान आहे. अनादी काळापासून हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असल्याचं गावातील वयोवृध्द सांगतात.
अकोला शहरा पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या चोहोट्टा बाजार गावापासून पाच किलोमीटर आणि करतवाडी रेल्वे मार्ग धामणा बुद्रुक येथून देखील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल गावात यंदाही भाविकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, पुणे, जळगाव खान्देश या ठिकाणाहून मोठ्या संख्येने आदिवासी कोळी समाजातील लोकांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उपस्थित राहिले. रेल गावात रेलेश्वर महादेव संस्थेत शिव पार्वती विवाहची हजारों वर्ष जुनी परंपरा आजही संस्थेने गावकऱ्यांच्या सहभागातून जोपासली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.
सुधाकर घुगरे अध्यक्ष आणि मंदिर विश्वस्तांनी हा लग्न सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तसेच रेलेश्वर संस्थेला ' क ' वर्ग चा दर्जा मिळवण्यासाठी सुधाकर घुगरे आणि विश्वस्तांनी अथक परिश्रम केले, हे विशेष.
‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
अकोला जिल्ह्यातील रेल येथील प्रसिद्ध श्री रेलेश्वर महादेव संस्थान येथील सभागृहाचे भूमीपुजन ऑगस्ट 2024 मध्ये अकोला पूर्वचे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते संपन्न झाले होते. या संस्थेला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घुगरे यांच्या आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुरवठा नंतर नुकतच ' क ' वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी श्री रेलेश्वर संस्थेच्या सभागृहासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उपलब्ध या निधीतून या ठिकाणी भव्य सभागृहाचे निर्माण करण्यात येत आहे. यामुळे येथे वर्षभर साजरा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी उपयोगी होणार असल्याचे अध्यक्ष सुधाकर घुगरे यांनी सांगितले.
रेल गाव
शिव पार्वती विवाह
सुधाकर घुगरे
Koli Mahadev community
Marriage ceremony
Rail village
Shiva Parvati
sudhakar ghugare
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा