- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file image
file image
भारतीय अलंकार न्यूज 24
मुंबई: अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज शुक्रवारी पहाटे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि 'भारत कुमार' या नावाने देखील ओळखल्या जात होते.
file image
24 जुलै 1937 रोजी मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. त्यांचे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. मात्र चित्रपट सृष्टीत त्यांना मनोज कुमार नाव मिळाले.
file imageमनोज कुमार यांनी केवळ अभिनयच नाही तर शहीद (1965), उपकार (1967), पूरब और पश्चिम (1970) आणि रोटी कपडा और मकान (1974) अशा अनेक देशभक्तीपर चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
देशभक्तीपर चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी हरियाली और रास्ता, वो कौन थी, हिमालय की गोद में, दो बदन, पत्थर के सनम, नील कमल आणि क्रांती सारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केलं आहे.
1995 मध्ये आलेल्या मैदान-ए-जंग या चित्रपटात ते अखेरचे मोठ्या पडद्यावर दिसले होते. मात्र अजरामर कलाकृती अतीउच्च अभिनय क्षमतामुळे आजही ते चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत आणि राहतील.
hariyali aur rasta
kranti
Manoj Kumar
Manoj kumar death
Mumbai
passes away
pathar ke sanam
polar star
silver world
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा